जल प्रदूषण कारणे Jal Pradushan in Marathi, Causes of Water Pollution in Marathi: पाणी हा घटक सजीवांच्या जीवनातील सर्वात महत्वाचा घटक आहे. पाण्याशिवाय सजीव जीवनाची संकल्पना करणे अशक्य आहे. सजीवांच्या शरीरातील प्रत्येक अवयवांचे काम सुरळीतपणे चालू राहण्यासाठी पाणी महत्वाची भूमिका बजावते. खरे तर पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम पाणी करत असते.
पृथ्वीवरील शुध्द पाणीच फक्त सजीवांना जगण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे. पृथ्वीवर एकुण पाण्याच्या फक्त 1 टक्के पाणी हे सजीवांसाठी पिण्यायोग्य आहे. हे पाणी नद्या, ओढे व नाले सरोवरे यांच्यातून साठलेले असते. हेच शुद्ध पाणी काही मानवनिर्मित विषारी घटकांमुळे जसे प्लॅस्टिक, रसायने, कचरा, मलमूत्र व मृत जीव जंतु यांच्या मिश्रणाने प्रदूषित होते परिणामी ते पिण्यास व इतर वापरास अयोग्य बनते.
पाण्याच्या अंगी स्वत: शुद्ध होण्याची क्षमता असते परंतु अलीकडे पाण्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात विषारी घटक मानवाद्वारे मिसळले जात आहेत कि त्यामुळे पाणी फार मोठ्या प्रमाणात प्रदूषित होऊ लागले आहे.
पाण्याचे महत्व सर्वांना माहीत असताना सुद्धा पाणी हे निरंतर दूषित होत असलेले आपल्या लक्षात येते.
विद्यार्थी मित्रांनो आज आपण जल प्रदूषित होण्याची प्रमुख कारणे पाहणार आहोत.
Jal Pradushan in Marathi
जल प्रदूषणाची व्याख्या (Definition of water pollution):
नैसर्गिक व मानवनिर्मित घटकांच्या मिश्रणाने ज्यावेळी पाणी दूषित व विषारी बनते त्यावेळी त्या दूषित पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटते व असे पाणी सजीवांना अपायकारक ठरते त्यावेळी जलप्रदूषण होते असे म्हटले जाते.
जल प्रदूषण प्रमुख कारणे खालील प्रमाणे (Major causes of water pollution):
1) कारखान्यातुन बाहेर फेकले जाणारे दूषितपाणी व कचरा:
वाढती कारखानदारी हे सुद्धा जल प्रदूषित होण्याचे सर्वात मोठे प्रमुख कारण आहे. कारखान्यातून फार मोठ्या प्रमाणात शिसे, रंग, प्लॅस्टिक, इतर रिकामे पॅकेटस, विषारी रसायने, तंतु व पारा असे अनेक विषारी घटक सांडपाण्याद्वारा नदीत, समुद्रात सोडले जातात, त्यामुळे असे विषारी घटक स्वच्छ पाण्याला दूषित करतात व हे पाणी पशू पक्षी, प्राणी व मानव यांच्यासाठी घातक बनते त्यामुळे असे पाणी हे प्रदूषित समजले जाते.
2) कातड़ी साफ करणारे कारखाने:
कातडी साफ करणारे कारखाने कातडी स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यातून बाहेर पडणारी घाण, कचरा, कातड्याचे तुकडे हे सांडपाण्याद्वारे नदी, नाले, व इतर पाण्याच्या स्त्रोतामध्ये सोडून देतात त्यामुळे सुद्धा जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे.
3) जलपर्णी वनस्पतींची वाढ:
पाण्यामध्ये जलपर्णी वनस्पतीची वाढ होणे हे सुद्धा एक जल प्रदूषणाचे महत्वाचे कारण आहे असे म्हणायला हरकत नाही कारण जलपर्णी ही वनस्पति पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण शोषून घेते त्यामुळे पाण्यातील प्राणवायु हा नाहीसा होतो परिणामी जल प्रदूषित होते.
4) गावातील/शहरातील सांडपाणी:
हे सुद्धा एक जलप्रदूषित होण्याचे कारण आहे, गावातील कचरा, कुडा, प्लॅस्टिकच्या बॅगा, बाटल्या, डबे, असे सर्व विषारी घटक गावातील महिला, पुरुष नदीच्या किनारी आणून फेकतात. तसेच गावातील सांडपाणी सुद्धा नदीला जाऊन मिळते त्यामुळे अश्या स्वरूपाचा कचरा सरळ पाण्यामध्ये जाऊन मिसळतो त्यामुळे जलजीवांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
5) दैनंदिन पाण्याच्या वापरातून होणारे जल प्रदूषण:
कपडे धुणे, भांडी घासणे, गायी म्हैस धुणे, गाड्या धुणे व आंघोळ करणे यामध्ये वापर होत असलेले साबण, डिटर्जेंट पाउडर, केमिक्ल्स यांचा वापर दररोज केला जातो व हेच दूषित पाणी सांडपाण्याच्या व्यवस्थेद्वारे नदीत, नाल्यात व ओढ्यात सोडले जाते.
6) कीटकनाशके व खत यांच्या वापरामुळे होणारे जल प्रदूषण:
शेतीमध्ये पिकांचे किड, रोग व अळी यांपासून संरक्षण व्हावे याकरिता मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर केला जातो, तसेच पिकांच्या सदृढ वाढीसाठी खतांचा बेसुमार वापर केला जातो. कीटकनाशकांमध्ये व खतांमध्ये मोठ्या प्रमाणात विषारी घटक असतात.
आम्हाला आशा आहे कि वर स्पष्ट केलेली “जल प्रदूषण कारणे Jal Pradushan in Marathi” तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने उपयोगी पडतील, तुमच्या वर्गातील विद्यार्थी मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.