सेवानिवृत्ती निरोप समारंभ सूत्रसंचालन, Seva Nivrutti Sutrasanchalan

सेवानिवृत्ती निरोप समारंभ सूत्रसंचालन: वयोमानानुसार प्रत्येक नोकरी करणार्‍या व्यक्तिला आयुष्यात कधी न कधी सेवानिवृत्ती घ्यावी लागते. सेवानिवृत्ती घेणार्‍या नोकरदाराला निरोप देण्याकरिता सेवानिवृत्ती निरोप समारंभ आयोजित केला जातो. मग प्रश्न येतो कि सेवानिवृत्ती निरोप समारंभ सूत्रसंचालन कसे करायचे तर मग खास सेवानिवृत्ती निरोप समारंभाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे कसे करायचे, सूत्रसंचालन करत असताना चारोळी कोणती वापरावी याबद्दल संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिली आहे.

सेवानिवृत्ती निरोप समारंभ सूत्रसंचालन

सेवानिवृत्ती निरोप समारंभ सूत्रसंचालन

कार्यक्रम पत्रिका

1. कार्यक्रमाची सुरुवात

2. पाहुण्यांना व्यासपीठावर आमंत्रित करणे

3. दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन

4. ईशस्तवन

5. स्वागतगीत

6. प्रास्ताविक

7. पाहुण्यांची ओळख

8. सत्कार सोहळा

9. विद्यार्थी व शिक्षकांचे भाषण

10. प्रमुख पाहुण्यांचे मनोगत

11. सत्कार मूर्तींचे विचार

12. अध्यक्षांचे भाषण

13. आभार प्रदर्शन

1. कार्यक्रमाची सुरुवात

स्वागतम, स्वागतम, सुस्वागतम

सज्ज सारे लोक आहेत क्षण आले अमृताचे, उजळलेला मंच आहे तेज जैसे पौर्णिमीचे, त्या मनालाही कळाले भाव माझ्या या मनाचे, गोड मानून घ्या रसिकहो शब्द माझे स्वागताचे. आज आपण या ठिकाणी सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी जमले आहोत. तरी उपस्थति पाहुण्यांच व मान्यवरांच मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो.

2. पाहुण्यांना व्यासपीठावर आमंत्रित करणे

तेजस्वी व्यक्तिमत्व आणि उत्तुंग कर्तुत्व ज्यांच्या ठायी स्थित आहे, सुसंस्कृत आचरण, निस्वार्थी समाजकारण ज्यांच्या जगण्याची रीत आहे.

अ. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय श्री ……………हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो.

ब. आपले आजचे आदरणीय सत्कार मूर्ती श्री ……………….व्यासपीठावर त्यांचे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो.

क. तसेच प्रमुख पाहुणे आदरणीय श्री ………………..हे व्यासपीठावर त्यांचे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनती करतो.

3. दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन

“जीवनाला हवी प्रकाशाची साथ, दिव्यामध्ये जळते छोटीशी वात, तरीही तिला आहे मानाचे स्थान, हे आहे आपणास ज्ञान.”  

उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो कि त्यांनी दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी.

4. ईशस्तवन

“निरोपाचा क्षण नाही शुभेच्छांचा क्षण आहे, पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारे मन आहे.”

रसिकांनो मन शांत व प्रस्सन ठेवण्यासाठी प्राथनेची गरज भासते. म्हणूनच आमच्या शाळेच्या विद्यार्थिनी आपणासमोर सुंदर असे ईश्वस्तवन सादर करणार आहेत. ईश्वस्तवनाचे बोल आहेत “……………………………”.

5. स्वागतगीत

“मंगलदिनी मंगलसमयी झाले आपले आगमन येथे, करितो स्वागत हर्षभराने प्रेमे गाऊनी स्वागतगीत.”

यानंतर आमच्या शाळेच्या विद्यार्थिनी स्वागत गीताच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांच स्वागत करतील. स्वागत गीताचे बोल आहेत “…………………………….”

6. प्रास्ताविक

“जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून कार्यक्रमाचा उद्देश कळतो प्रस्ताविकेतून तसेच तुटलेली फुले सुंगध देऊन जातात, गेलेले क्षण आठवणी देऊन देतात.”

आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आदरणीय ……………यांचा परिचय आमच्या शाळेचे मुख्याध्यापक करून देतील, अशी मी त्यांना विनंती करतो.

7. पाहुण्यांची ओळख

“मनात आठवणी तर खूप असतात, कालांतराने त्या सरून जातात, तुमच्या सारखी माणसे खूप कमी असतात, जे हृदयात घर करून राहतात.”

आज आपले भाग्य म्हणून आपल्याला हे पाहुणे लाभले आहेत. म्हणून व्यासपीठावरील पाहुण्यांचा परिचय करून देणे आवश्यक आहे, त्यासाठी मी………….यांना आमंत्रित करतो. 

8. सत्कार सोहळा

“परिश्रमाने कार्य ज्यांचे बहरले आले फळा, सत्काराच्या पुष्पमाला अर्पूया त्यांच्या गळा.”

“सत्कार आपला करण्यास आम्हा हर्ष वाटतो, आनंदित झाल्या दिशा सत्कारने स्नेह वाढतो.”

यानंतर सत्कार सोहळा संपन्न होत आहे. 

अ.अध्यक्षांचे स्वागत

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री ……………….यांचे स्वागत आदरणीय श्री ………………… हे शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन करतील. यांना मी विनंती करतो.

ब. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत

आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री ………………यांचे स्वागत आदरणीय श्री ……………………. हे शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन करतील. यांना मी विनंती करतो.

क. सत्कारमूर्तीचा सत्कार अध्यक्षांच्या हस्ते करावा.

आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय सत्कार मूर्ती श्री …………………यांचे स्वागत कार्यक्रमाचे अध्यक्षआदरणीय श्री ……………………..हे शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन करतील. त्यांना मी विनंती करतो.

9. विद्यार्थी व शिक्षकांचे भाषण

यानंतर आमच्या शाळेतील इयत्ता …………. वी तील विद्यार्थी ………… सत्कारमूर्ती विषयी आपले मनोगत व्यक्त करतील.

यानंतर आदरणीय श्री ………………सर सत्कारमूर्ती विषयी आपले मनोगत व्यक्त करतील.

10. प्रमुख पाहुण्यांचे मनोगत

शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे, आपल्या विचारांनी इतरांना मार्गदर्शन करणारे,  आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. 

11. सत्कार मूर्तींचे विचार

“निरोपाच्या हळव्या क्षणी दाटून येती आठवणी, डोळ्यात साठते पाणी मुक होते वाणी.”  

आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आदरणीय श्री…………………आपणास मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो.

12. अध्यक्षांचे भाषण

“ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा त्यासाठी मान आहे अध्यक्षीय भाषणाचा.”

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री…………………आपणास मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो.

13. आभार प्रदर्शन

या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आपण सर्वजण उपस्थति राहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो.

थोडक्यात अंतिम शब्द

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सूत्रसंचालन कसे वाटले हे आम्हाला नक्की सांगा. तुम्ही तुमच्या वर्गमित्र आणि शाळेतील सर -मॅडम बरोबर आजच्या पोस्टमधील सूत्रसंचालनाचा फॉरमॅट आवश्यक share करा.👍

Leave a Comment