नवनाथ पारायणाचे फायदे, Navnath Bhaktisar Benefits in Marathi

भाविकांनी नवनाथ पारायणाचे फायदे, Navnath Bhaktisar Adhyay 40 Benefits in Marathi मध्ये जाणून घ्यायचे आहेत तर तुम्ही अगदी योग्य वेबपेजवर आला आहात. आज आम्ही या ब्लॉग पेजवर नवनाथ पारायणासाठी आवश्यक साहित्य, ग्रंथ वाचनासाठी शुभ नक्षत्र, वाचनाचे नियम व नवनाथ पारायणाचे फायदे यांविषयी थोडक्यात माहिती दिली आहे.

नवनाथ पारायणाचे फायदे

नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ १८१९ मध्ये मालू नरहरी यांनी लिहिला, या ग्रंथामध्ये एकुण ४० अध्याय व ७६०० ओव्या आहेत. नवनाथ भक्तिसार पारायणाच्या प्रत्येक अध्यायाचे वेगवेगळे फायदे सांगितले गेले आहेत, ते खालील तक्त्यामध्ये अध्याय क्रमांकापुढे दिलेले आहेत.

अध्याय क्रमांक फायदे
अध्याय १बाधा नाहीशी होऊ शकते.
अध्याय २धन प्राप्ती होऊन कार्य सफल होते.  
अध्याय ३शत्रूचा नाश विद्यांची प्राप्ती होते व घरात मारुतीरायाचे वास्तव्य होते.
अध्याय ४लोकांनी कपटाने रचलेली बंधने सुटतील शत्रूचा पराभव होईल, मान सन्मान मिळेल.
अध्याय ५भूत बाधा थांबेल.
अध्याय ६शत्रूचे विचार परिवर्तन होऊन तो मित्र बनेल.
अध्याय ७व्यथा चिंता संपून जाईल. 84 लाख योनीत जन्म येणार नाही.
अध्याय ८दूर गेलेला मित्र परत येईल, चिंता दूर होईल.
अध्याय ९14 विद्या व 64 कला प्राप्त होतील.
अध्याय १०त्रिदोष नाहीसे होतील व मन सात्विक बनेल, मुले जगतील.
अध्याय ११अग्निपीडा दूर होईल, व घरातील दोष नाहीसे होतील. संतती प्राप्त होईल.
अध्याय १२देवतांचा शोक संपेल व देवता अनुग्रह करतील.
अध्याय १३स्रि हत्येचा दोष संपेल व पूर्वजांचा उद्धार होईल.
अध्याय १४कारागृहातून सुटका होईल.
अध्याय १५घरात सुख शांति लाभेल भांडण होणार नाही.
अध्याय १६वाईट स्वप्ने पडणार नाहीत.
अध्याय १७योग सिद्धी लाभेल व सन्मार्गाची प्राप्ती होईल.
अध्याय १८ब्रह्म हत्येचा दोष संपले.
अध्याय १९मोक्ष मार्ग मोकळा होईल.
अध्याय २०मन ताब्यात राहील व संसार सुखाचा होईल.
अध्याय २१गाय हत्येचे पाप नष्ट होईल आणि तपो लोकांत प्रवेश होईल.
अध्याय २२ज्ञान संपन्न मुलगा जन्माला येईल.
अध्याय २३सोने टिकून राहील.
अध्याय २४बाल हत्या दोष नाहीसा होईल व मुलबाळे सुखी होतील.
अध्याय २५शाप लागणार नाही, मनुष्य जन्म मिळेल व सुंदर पत्नी मिळेल.  
अध्याय २६गो हत्येचा दोष संपेल व मुले शत्रुतूल्य होणार नाहीत.
अध्याय २७गमावलेली वस्तु परत मिळेल, अधिकार पुन्हा प्राप्त होईल.  
अध्याय २८गुणवान स्रिशी लग्न होईल व ती पतीची सेवा करेल.
अध्याय २९क्षय रोग बरा होईल.
अध्याय ३०चोरांची दृष्टी नाहीशी होईल.
अध्याय ३१शाबरी मंत्राचे कपटे प्रयोग आपणावर होणार नाहीत.
अध्याय ३२गंडान्तरे संपतील व आयुष्य वाढेल.
अध्याय ३३धनुर्वात होणार नाही.
अध्याय ३४कर्म सिद्धि होऊन जीवन यशस्वी बनेल.
अध्याय ३५महासिद्धी प्राप्त होऊन 42 पिढ्यांचा उद्धार होईल.
अध्याय ३६साप व विंचू यांचे विष उतरेल.
अध्याय ३७विद्या प्राप्त होईल.
अध्याय ३८हिवताप, नवज्वर नाहीसे होतील.
अध्याय ३९युद्ध जिंकाल.
अध्याय ४०कामधेनु प्रमाणे सर्व इच्छा पूर्ण होतील.

नवनाथ पारायणासाठी आवश्यक साहित्य

विडयाची पाने, सुपारी, नारळ, फुले, अगरबत्ती, पेढे, खडीसाखर आणि नवनाथांचा फोटो इत्यादि साहित्य अगोदर एकत्र करून ठेवावे.

नवनाथ पारायणाची सुरुवात कोणत्या दिवशी करावी

नवनाथ भक्तिसार पारायणाची सुरुवात शुभ नक्षत्रावर गुरुवार किंवा शुक्रवार या शुभ दिवशी करणे फलदायक ठरते. अश्विनी रोहिणी, मृग, पुष्प, उत्तरा, हस्त, चित्रा, अनुराधा आणि रेवती या शुभ नक्षत्रावर नवनाथ भक्तिसार पारायण वाचन पुजन केले जाते. 

श्रावण महिना आला कि अनेक भक्त नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे वाचन करतात. नवनाथ भक्तिसार  पारायण वाचनासाठी श्रावण महिना उत्तम मानला जातो. श्रावण महिन्यात नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे वाचन केल्यास अद्भुत अनुभव साधकाला पाहायला मिळतात. नवनाथ भक्तिसार ग्रंथ हा नऊ दिवसांमध्ये वाचला जावा.

नवनाथ पारायण नियम

1. ग्रंथ वाचनास बसताना पूर्व दिशेला तोंड करून बसावे.

2. रोजचे वाचन पूर्ण झाल्यानंतर न चुकता आरती करावी व गोड प्रसादाचे वाटप करावे.

3. श्री नवनाथ पारायण हे महिला व पुरुष दोन्ही करू शकतात.

4. नऊ दिवसांच्या ग्रंथ वाचनामध्ये ब्रह्मचर्यव्रत पाळावे.

नऊ दिवसांचे पारायण वाचत असताना ते खालील प्रमाणे वाचावे

पहिला दिवसअध्याय १ ते ६
दुसरा दिवसअध्याय ७ ते ११
तिसरा दिवसअध्याय १२ ते १६
चौथा दिवसअध्याय १७ ते २१
पाचवा दिवसअध्याय २२ ते २६
सहावा दिवसअध्याय २७ ते ३१
सातवा दिवसअध्याय ३२ ते ३५
आठवा दिवसअध्याय ३६ ते ३८
नववा दिवसअध्याय ३९ ते ४०

भाविकांनो नवनाथ पारायणाचे फायदे यांचा अनुभव तुम्हाला आल्यास तुमच्या इतर मित्रांना सुद्धा नवनाथ पारायणाविषयी माहिती द्या.

Leave a Comment