सावित्रीबाई फुले भाषण मराठीत अंगावर शहारे आणणारे

सावित्रीबाई फुले भाषण, सावित्रीबाई फुले भाषण कविता, सावित्रीबाई फुले भाषण फोटो, सावित्रीबाई फुले भाषण मराठीत, savitribai phule bhashan, सावित्रीबाई फुले माहिती, savitribai phule bhashan 2022,

आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील मान्यवर गुरुजनवर्ग व येथे जमलेल्या माझ्या मैत्र मैत्रीणिंनो आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी चार शब्द सांगणार आहे ते आपण सर्वांनी नम्रपणे शांतपणे ऐकुन घ्यावेत अशी मी विनंती करते.

सावित्रीबाई फुले भाषण मराठीत

लेकीप्रमाणे आम्हाला वाढवलेस, शिकवून सवरून मोठे केलेस, ताठ मानेने जगायला शिकवलेस, कसे फेडू तुझे उपकार तू तर दिव्यासारखे तेवत राहायला शिकवलेस.

सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगणं म्हणजे सर्वप्रथम आपणास त्यांना समजून घ्यावे लागेल. सावित्रीबाई फुले यांना समजून कसं घ्यायचं हा जेव्हा मी प्रथम विचार करायला लागते/लागतो त्या वेळी माझ्या मनात विचार येतो कि सावित्रीबाई शिकल्या त्यांनी मुलींना शिकवलं हे बोलायला वाचायला खूप सोप आहे पण सावित्रीबाई फुले ज्या परिस्थितीमध्ये शिकल्या व मुलींना शिकवलं त्या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने सावित्रीबाई कोण होत्या  हे आपल्याला कळेल.

ज्या काळात मुली जन्माला येणे हे सुद्धा पाप समजले जात होतं, ज्या काळात मुली नऊ दहा वर्षाच्या झाल्या की त्यांचं लग्न त्यांच्यापेक्षा वीस ते पंचवीस वर्षे वयाने मोठ्या पुरुषाशी लावून दिलं जात होतं अशी भयंकर परिस्थिती होती. त्या काळात महिलांना अबला कमजोर समजलं जायचं. त्या काळात महिलांना शिक्षणाचे अधिकार नव्हते त्याना समाजात मान सन्मान नव्हता त्याकाळी महिला फक्त चूल व मूल याकरिताच होत्या.

त्या काळच्या काही कर्मठ लोकांना माहीत होतं या महिला जर साक्षर झाल्या तर आपला तबला वाजवल्या शिवाय राहणार नाहीत. अशा अंधकाराच्या वातावरणात एका वाघिनीचा जन्म झाला आणि त्या वाघिनीचे नाव म्हणजे सावित्रीबाई फुले होय. सावित्रीबाई फुले हे नाव जरी ऐकलं तरी सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर उभ राहत त्यांचं सुंदर प्रतिबिंब. सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणासाठी त्यांच अख्ख आयुष्य पणाला लावलं. सावित्रीबाई फुले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी, स्त्रीमुक्तीसाठी व स्त्री शिक्षणासाठी खर्च केल.

अशा पद्धतीने सावित्रीबाई फुले यांचा ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी वडील खंडोजी आणि आई सत्यवती यांच्या पोटी झाला. रूढी परंपरेनुसार सावित्रीबाई फुले यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील असाच एक प्रसंग आहे, सावित्रीबाई फुले बाजारामध्ये गेल्या असताना त्यावेळी एका ख्रिश्चन गृहस्थाने त्यांना ख्रिश्चन चरित्र या नावाचे पुस्तक भेट म्हणून दिले होते सावित्रीबाई फुले यांनी ते पुस्तक हातामध्ये घेतल आणि पाहिलं तर त्यातल एक अक्षर सुद्धा त्यांना वाचता आल नव्हतं आणि तेव्हापासून त्याच्या मनामध्ये एक एक जिज्ञासा निर्माण झाली कि काही का होईना पण हे पुस्तक संपूर्ण वाचून काढायचं आणि त्यासाठी आपण स्वतः साक्षर व्हायचं.

तेव्हापासून स्त्री शिक्षणाची ज्योत सावित्रीबाई फुले यांच्या मनामध्ये पेटली. पुस्तक वाचण्याच्या जिज्ञासेपोटी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे धडे ज्योतिबा फुले यांच्याकडून घ्यायला सुरुवात केली आणि सावित्रीबाई फुले सर्वप्रथम स्वतः शिक्षित झाल्या. आपण समाजातील अनेक महिलांना मुलींना आपल्याप्रमाणेच साक्षर करू शकतो आणि त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देऊ शकतो हा विचार मनात आला आणि सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबा फुले यांच्या मदतीने स्त्री शिक्षणाचे कार्य सुरू केले.

सावित्रीबाई फुले घरोघरी जाऊन महिलांना त्यांच्या मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असत व साक्षर होण्यासाठी शिक्षणाचे धडे घेण्याचा आग्रह करत असत. समाजातील सर्व महिलांना मुलींना शिक्षित करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांना एकाच छताखाली सर्व महिलांना व मुलींना साक्षर करता यावे शिक्षणाचे धडे देता यावे यासाठी त्यांना एका शाळेची उणीव भासू लागली आणि त्यासाठी त्यांनी १ जानेवारी १८४८ रोजी त्यांनी पुण्यातील बुधवार पेठेत स्त्रियांसाठी पहिली शाळा काढली. मुलींची पहिली शाळा काढून त्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि महिला शिक्षणाचा त्यांनी खर्‍या अर्थाने पाया रोवला.

सावित्रीबाई फुलेंचे शिक्षणाचे कार्य सुरू असताना त्यांना अनेक कर्मठ लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात त्रास दिला. प्रसंगी त्यांच्या अंगावरच दगड शेण फेकून मारले आणि त्यांचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला तरीही सावित्रीबाई फुले यांनी अशा कर्मठ लोकांना भीक घातली नाही कारण त्यांच्या पाठीशी जोतीराव फुले हे खंबीरपणे उभे होते. त्यांनी आपल्या पतीला सोबत घेऊन त्यांची मदत घेऊन त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले आणि आज आपण जी परिस्थिती पाहतो आज ज्या समाजातील महिलांनी जी प्रगती केली आहे. आज समाजातील स्त्री पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून संघर्ष करत आहे यशस्वी होत आहे हे केवळ सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळे त्यांच्या प्रेरणेमुळे.

अखेर प्लेगग्रस्त रोग्यांची सेवा करत असताना सावित्रीबाई फूले यांना सुद्धा प्लेगची लागण झाली आण त्यातच त्यांचा मृत्यू १० मार्च १८९७ रोजी झाला.

Leave a Comment