Resignation Letter In Marathi format, Rajinama Letter In Marathi, राजीनामा अर्ज नमुना मराठी.
नोकरी सोडण्याची अनेक कारणे असू शकतात, घर ते काम अंतर जास्त असणे, वेतन कमी व अनियमित मिळणे. व्यवस्थापक व सहकारी कर्मचाऱ्यांशी वाद निर्माण होणे किंवा आजारपण अशी अनेक कारणे नोकरी सोडण्यासाठी जबाबदार असू शकतात.
वाढत्या बेरोजगारीमुळे सध्याच्या काळात नोकरी मिळणे कठीण बनले आहे. त्यामुळे नोकरी मिळवण्यापासून ते नोकरी टिकवण्यापर्यंत ही एक मोठी कसरतच असते. नोकरी करत असताना आपल्याला जादा काम, ऑफिस मध्ये जास्त वेळ थांबावे लागणे, सहकाऱ्यांशी वाद, बॉसची कटकट अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते पण नोकरी टिकवण्यासाठी ते सर्व सहन करावे लागते.
नोकरी एक व्यवसायाप्रमाणेच उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. दैनंदिन जीवनातल्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी काही लोकांना नोकरी करणे भाग पडते, आणि काही वेळा वेतन कमी व अनियमित मिळत असले तरी नोकरी करणे भाग पडते.
इयत्ता नववी व इयत्ता दहावीच्या मराठी विषयाच्या पेपरमध्ये पत्रलेखन या विभागामध्ये राजीनामा पत्र या विषयावर पत्र लिहा हा प्रश्न हमखास विचारला जातो, त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाच्या दृष्टीने ही माहिती खूप उपयुक्त आहे. आज या लेखामध्ये नोकरी सोडण्याबाबत राजीनामा अर्ज/पत्र संबंधित मॅनेजरला कसे लिहिले जावे याविषयी माहिती दिली आहे.
Resignation Letter In Marathi
नमूना पत्र १:
सुरेश कुमार,
संस्कृती अपार्टमेंट,
पुणे 30 31 12.
माननीय व्यवस्थापक,
आयटी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड,
पुणे 30 31 12.
विषय: नोकरी सोडणे बाबत राजीनामा पत्र
माननीय महोदय,
मी सुरेश प्रेम कुमार आपल्या कंपनीत कॉम्प्युटर ऑपरेटर या पदावर कार्यरत असून काही वैयक्तिक कारणांमुळे मला कामावर हजर राहता येणार नाही, त्यामुळे मी दिनांक 10/1/2021 रोजी कॉम्प्युटर ऑपरेटर या पदाचा राजीनामा देत आहे. आपण मला आपल्या कंपनीत काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. कॉम्प्युटर ऑपरेटर या पदावर काम करत असताना अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या तसेच मॅनेजर साहेबांचे व सहकारी कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे आपल्या सर्वांचा मी खूप आभारी आहे, आपण दिलेल्या संधीमुळे माझ्या वैयक्तिक जीवनात तसेच व्यावसायिक जीवनात खूप प्रगती झाली आहे. आपल्या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन माझ्या आयुष्यात एक नवा आदर्श बनेल असे मला वाटते.
धन्यवाद,
आपला नम्र
सुरेशकुमार
जर तुम्हाला “Resignation Letter In Marathi format, Rajinama Letter In Marathi” या पोस्टमध्ये दिलेली माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडिया वर नक्की शेअर करा.