मागणी पत्र लेखन शिका Magni Patra Lekhan in Marathi

Magni patra lekhan in Marathi 2020 2021, मागणी पत्र लेखन मराठी. magni patra in Marathi. Magni patra in Marathi 10th 9th, Pustakachi magni karnare patra lekhan, Shaley granthalaya sathi pustakachi magni karnare patra.

मागणी पत्र हे औपचारिक पत्र लेखनामध्ये येते. आज आपण या लेखामध्ये मागणी पत्र कशाप्रकारे लिहिले जाते याचा अभ्यास करणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त असे मागणीपत्र या लेखामध्ये देण्यात आले आहे. उत्तरपत्रिकेमध्ये अशा प्रकारचे मागणी पत्र लेखन अपेक्षित असते.

मागणी पत्र म्हणजे काय?

एखाद्या सेवेची किंवा वस्तूची मागणी करण्याबाबत लिहिले गेलेले पत्र त्याला मागणी पत्र असे म्हणतात.

महत्वाचे मुद्दे:

1) मागणी पत्र लिहिताना प्रश्नपत्रिकेमध्ये जी माहिती प्रश्नात देण्यात आली आहे त्या माहितीचा वापर पत्र लिहिताना करण्यात यावा. (पत्ता, दिनांक, वेळ, सवलत इत्यादी)

2) पत्र लिहिताना जी सवलत दिनांक प्रश्नामध्ये देण्यात आली आहे, त्याच दरम्यानची दिनांक पत्रामध्ये नमूद करावी

Magni Patra Lekhan in Marathi

मागणी पत्र जाहिरात (मागणी पत्र लेखन मराठी)

“ज्ञान हेच सामर्थ्य” कावेरी पुस्तकालय, राणे चौक, शनिवार पेठ, गाळा नंबर 4, पुणे 30.                                         
शिवजयंती निमित्त खास आकर्षण प्रत्येक पुस्तकावर 25% सूट

सवलत दिनांक: 10 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी

वेळ: सकाळी 9 ते रात्री 9

ग्रंथालय प्रतिनिधी या नात्याने संबंधित व्यक्तीला शाळेसाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.
मागणी पत्र लेखन मराठी

दिनांक 10 फेब्रुवारी 2021.

कावेरी पुस्तकालय,

राणे चौक,                                          

शनिवार पेठ,                                         

गाळा नंबर 4,                                               

पुणे 30.

विषय: ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणे बाबत.

महोदय,

मी दा.म.शास्त्री, म्हात्रे विद्यालय सातारा. शाळेचा ग्रंथालय प्रतिनिधी(ग्रंथपाल) मी आपणास शाळेच्या वतीने पुस्तकांची मागणी करणे बाबत पत्र पाठवत आहे. आजच्या दैनिक वर्तमानपत्रामध्ये आपल्या पुस्तकालयाची जाहिरात वाचली. आपली शिवजयंतीनिमित्त देण्यात आलेली खास सवलत प्रशंसनीय आहे. जाहिरातीमध्ये शिवजयंतीनिमित्त देण्यात आलेली पुस्तक खरेदी वरची खास सवलत पाहून आम्ही आपल्या पुस्तकालयातून काही पुस्तके खरेदी करू इच्छित आहोत. पत्रासोबत काही निवडक पुस्तकांची यादी पाठवत आहे. आशा आहे कि ही सर्व पुस्तके आपल्याकडे उपलब्ध असतील.

कळावे

आपला नम्र

दा. म. शास्त्री (ग्रंथपाल), म्हात्रे विद्यालय, सातारा 415508.

पुस्तकांची यादी

नावनगलेखक
ययाती10वि स खांडेकर    
तीन हजार टाके10सुधा मूर्ती
गुलामगिरी10ज्योतिराव फुले
झोंबी10आनंद यादव
मागणी पत्र लेखन मराठी

सवलत वजा करून येणारी एकूण देय रक्कम शाळेच्या अधिकृत फोन नंबर किंवा ईमेल वर कळविण्यात यावी. फोन नंबर 55009966 ई-मेल [email protected]

मागणी पत्र लेखन मराठी. Magni Patra Lekhan in Marathi Pustakachi magni patra in Marathi. Magni patra in Marathi 10th 9th. या पत्र लेखनामध्ये देण्यात आलेली माहिती अभ्यासाच्या दृष्टीने उपयुक्त वाटत असल्यास आपल्या मित्रांसोबत सोशल मीडिया वर नक्की शेअर करा.

Leave a Comment