डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले आणि श्रेष्ठ गुरु कोण? चे उत्तर

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले आणि श्रेष्ठ गुरु कोण हा प्रश्न गूगल व इतर सोशल प्लॅटफॉर्मवर सतत विचारला जातो. आज आपण याच प्रश्नाचे नेमके खरे उत्तर काय आहे हे या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले आणि श्रेष्ठ गुरु कोण

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखनातून व विचारांतून त्यांचे खरे श्रेष्ठ गुरु कोण यांचा उल्लेख केलेला आढळतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात तीन गुरु मानले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले आणि श्रेष्ठ गुरु गौतम बुद्ध होते तर दुसरे गुरु संत कबीर होते आणि तिसरे गुरु महात्मा जोतीराव फुले होते.

20 ऑक्टोबर 1954 रोजी पुरंदरे स्टेडियम, मुंबई येथे केलेल्या भाषणामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या तीन गुरूबद्दल लोकांना माहिती दिली होती. (संदर्भ: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 3)

1. गौतम बुद्ध

डॉ बाबासाहेब आंबडेकर हे गौतम बुद्धांच्या थोर विचारांनी प्रेरित झाले होते. बुद्धांचा धर्म हा विज्ञानवादी आहे, बौद्ध धर्मात माणसाला माणूस म्हणून वागवले जाते. बौद्ध धर्मात माणसा माणसात कोणताही भेदभाव केला जात नाही, त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर हे बुद्धांच्या विचारांचे प्रामाणिक पाईक बनले.

“The Buddha and His Dhamma” (बुद्ध आणि त्यांचा धम्म) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल शेवटचं पुस्तक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या जगाला गौतम बुद्धांची ओळख करून दिली.

2. संत कबीर

संत कबीर हे 15 व्या शतकातील एक कवी व थोर विचारवंत होते. संत कबीर हे त्या काळी शूद्र समजल्या जाणार्‍या जातीत जन्माला आले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे वडील हे कबीरपंथी होते त्यामुळे त्यांच्या विचारांचा व कार्याचा डॉ बाबासाहेब आंबेडकरांवर बराच प्रभाव पडला होता.

त्याकाळी संत कबीर यांनी मानवतावादी विचार मांडले होते. आपले श्रेष्ठत्व इतरांवर लादणार्‍या लोकांना त्यांनी प्रखर विरोध केला होता. संत कबीर यांच्या मानवतावादी कार्याने डॉ बाबासाहेब आंबडेकर प्रभावित झाले होते.

3. महात्मा जोतीराव फुले

आधुनिक भारतामध्ये अस्पृश्य समाज, महिला व शेतकरी यांच्या मुक्ति लढ्याचे पहिले महानायक क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले होते. “शूद्र पूर्वी कोण होते” हे पुस्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा जोतीराव फुले यांना समर्पित केले आहे. त्याकाळी महात्मा फुले यांनी अस्पृश्य समजल्या जाणार्‍या समाजाला आपल्या हक्काची जाणीव करून दिली. त्यांच्यावर होणार्‍या अन्याया प्रति जागरूक केले.

महात्मा जोतीराव फुलेंनी देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्याला अधिक महत्व दिले. क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांची अस्पृश्य समाजाप्रति असलेले आस्था पाहून, त्यांचे मानवतावादी कार्य पाहून, वैज्ञानिक विचार पाहून डॉ बाबासाहेब आंबडेकर प्रभावित झाले होते.

Leave a Comment