मांजर निबंध मराठी {हुबेहूब वर्णन} Essay On Cat in Marathi

Essay On Cat in Marathi, My favourite animal cat in Marathi, Information on cat in Marathi, Majha avadta prani manjar Marathi nibandh, Cat chi mahiti Marathi.

मांजर हे एक घरगुती छोटा पाळीव प्राणी आहे. मांजराला एक तोंड, दोन डोळे, दोन छोटे कान, चार पाय, आणि एक शेपूट असते. मांजराचा रंग साधारणपणे काळा, आणि पांढरा असतो. मांजराचे डोळे चमकदार असतात. मांजराचे दात खूप तीक्ष्ण असतात.

आपल्या धार दार दाताने ते उंदराची शिकार सहजपणे करू शकते. अंधारामध्ये मांजराचे डोळे चमकतात. अंधारमध्ये सुद्धा मांजर सर्व काही पाहू शकते. मांजराचे नाक छोटेसे आणि लालसर असते. उंदीर हे मांजराचे आवडते अन्न आहे. मांस, मासे, आणि दूध हे पदार्थ मांजराला खाण्यास खूप आवडतात.

Essay On Cat in Marathi
Essay on cat in Marathi language, maza avadta prani manjar nibandh in Marathi.

मांजर मांसाहारी पदार्थाचा वास लगेच घेऊ शकते आणि पटकन त्या मांसाहारी पदार्थाकडे धाव घेते. मांजर हे दबक्या पावलांनी चालते. मांजर कितीही उंचावरून जरी पडले तरी ते तोल सावरून चार पायांवरती जमीनवर उतरते. जगातील प्रत्येक कानाकोपर्‍यात, पत्येक ठिकाणी मांजर आढळते. घरामध्ये आवडीने मांजर पाळले जाते. मांजराचे केस मुलायम असतात.

पांढर्‍या रंगाचे मांजर लहान मुलांना खूप आवडते. सरपटणारे प्राणी मांजरा जवळ येण्यास घाबरतात, सरपटणार्‍या प्राण्यांची शिकार मांजर सहजपणे करू शकते. मांजराचे शरीर मऊ केसांनी झाकलेले असते. मांजराचे शरीर उबदार असते. मांजर हे छोटासा वाघ असल्यासारखे दिसते. लहान मुलांना मांजराबरोबर खेळायला खूप आवडते.

उबदार ठिकाणी मांजर राहण्यास खूप पसंत करते, त्यामुळे ते जास्त करून अंथुरणावर, तसेच कपड्यावर बसलेले दिसते. घरामध्ये बनवलेले पदार्थ सुद्धा मांजर खाते, जसे भात, चपाती इत्यादि. मांजर हे म्याऊँ म्याऊँ असा आवाज करते. मांजर कुत्र्याला जास्त घाबरते. दोन मांजरांची झुंज ज्यावेळी लागते त्यावेळी मांजर खूप कर्कश, कानाला असह्य असा आवाज करतात. जगातील प्रत्येक प्रदेशात मांजर आढळते.

Essay On Cat in Marathi

ग्रामीण भागामध्ये मांजराच्या नर जातीला बोका असे म्हणतात. जास्तकरून पांढर्‍या रंगाचे मांजर पाळण्यास लोकांना खूप आवडते. ग्रामीण भागातील लोकांचे मांजरा बद्दल काही गैर समज सुद्धा आहेत, जसे मांजर रस्त्यामध्ये आडवे आल्यास तो एक अपशकुन मानला जातो आणि अशावेळी प्रवासाचा रस्ता सुद्धा बदलला जातो अथवा ते काम तरी पुढे ढकलले जाते.

Essay On Cat in Marathi

आपल्या भारत देशामध्ये मांजराला काही बाबतीत अशुभ मानले जाते तर दुसर्‍या देशात मांजर पाळणे ही तेथील पारंपारिक प्रथा आहे. काळ्या रंगाच्या मांजराला जास्त करून अशुभ मानले जाते.

मांजरावर अनेक छानश्या गोष्टी सुद्धा आहेत त्या गोष्टींची नावे बुड बुड घागरी, जादू च मांजर, मांजराच्या गळ्यात घंटी कोण बांधणार, माकड आणि मांजर, मांजर आणि कुत्रे, मांजराची गंमत, सिंह आणि मांजर आणि उंदीर आणि मांजर अशी आहेत आपण या सर्व गोष्टी लहान मुलांच्या पुस्तकामध्ये तसेच यूट्यूब वर पाहू शकता. तसेच अनेक काल्पनिक कथांमध्ये सुद्धा मांजराची सुंदर भूमिका रेखाटली गेली आहे.

सूचना: जर तुम्हाला Essay on cat in Marathi language, maza avadta prani manjar nibandh in Marathi. हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा

Leave a Comment