जर मी पंतप्रधान झालो तर मराठी निबंध | Jar mi pantpradhan zalo tr essay in marathi.

मी पंतप्रधान झालो तर निबंध मराठी / Mi pantpradhan zalo tr nibandh in marathi.

mi pantpradhan zalo tr essay in marathi

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये आम्ही परत एक नवीन मराठी निबंध घेऊन आलो आहोत. या पोस्टमध्ये दिलेल्या निबंधाच्या मदतीने तुम्ही “मी पंतप्रधान झालो तर” हा निबंध कश्या प्रकारे लिहायचा हे शिकू शकता. आम्ही दिलेला निबंध लक्षात ठेवून तुम्ही पंतप्रधान झाले तर तुम्ही काय बदल करतांन हे तुम्ही तुमच्या भाषेत लिहिणे फार गरजेचे आहे.

पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा प्रमुख असतो, त्याच बरोबर संपुर्ण देशाचा भार त्यावर असतो. एका देशाचा पंतप्रधान देशाच्या विकासात खूप महत्त्वाचे योगदान देत असतो. तुम्हाला आपल्या भारत देशात कोणत्या प्रकारचे बदल करावे वाटतात हे तुम्ही या निबंधात आणखी जोडू शकता.

जर मी पंतप्रधान झालो तर मराठी निबंध / Jar mi pantpradhan zalo tr essay in marathi.

प्रस्तावना

प्रत्येक देशामध्ये पंतप्रधानपद हे अत्यंत महत्त्वाचे पद असते. एक चांगला पंतप्रधानच देशाला गरिबीतून प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे मी जर भारताचा पंतप्रधान झालो तर माझी पहिली प्राथमिकता असेल की
भारतातील शिक्षण व्यवस्था सुधारणे, माझी दुसरी प्राथमिकता असेल की सर्व लोकांना अन्न, वस्त्र आणि निवारा मिळेल याची सोय करणे आणि माझी तिसरी प्राथमिकता असेल की सर्व लोकांच्या जीवित आणि मालमत्तेला एक चांगली सुरक्षा प्रदान करणे. जेणेकरून आपल्या भारतात कोणताही नागरिक कुठेही प्रवास करू शकेल.

मी मी पंतप्रधान झालो तर खालील कामे करील.

शिक्षण व्यवस्थेत सुधारणा

देशाची शिक्षण व्यवस्था सुधारणे हे माझे पंतप्रधान झाल्यावर पहिले काम असेल कारण निरक्षरतेमुळे देशात गरिबीचे प्रमाण अधिक वाढत आहे. त्यासाठी शिक्षण पद्धतीत पूर्णपणे बदल करून त्यात सुधारणा करणे आज गरजेचे झाले आहे. कोणत्याही आरक्षणाशिवाय पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन स्तरापर्यंत मोफत शिक्षण देण्यास माझे मुख्य प्राधान्य असणार आहे.

मला असे वाटते की आजची शिक्षण प्रणाली ही प्रात्याक्षिकावर आधारित असली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांना शालेय जीवनात गोष्टी कश्या प्रकारे काम करतात हे कळेल. त्यामुळे मी सर्वात पहिले घोकंपट्टीचे शिक्षण बंद करून प्रात्याक्षिकावर आधारित शिक्षण प्रणाली विकसित करण्यावर भर देईल.

अन्न, वस्त्र आणि निवारा प्रदान करणे

भारतातील प्रत्येक नागरिकाला अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत सुविधा पुरवणे म्हणजे देशाला विकसित राष्ट्राकडे अग्रेसर करण्यासारखे आहे. देशातील प्रत्येक नागरिकांचे अन्न, वस्त्र आणि निवारा मिळवणे कर्तव्य आहे त्याचबरोबर अधिकार आहे, परंतु काही कारणास्तव मागासलेल्या लोकांना या प्राथमिक गरजा पूर्ण करणे शक्य होत नाही.

मी भारतात सरकारी नोकऱ्यांसाठी शक्य तितक्या रिक्त जागा निर्माण करीन जेणेकरून लोकांना नोकऱ्यांसाठी भटकावे लागणार नाही. लोकांना अधिकाधिक रोजगार मिळावा यासाठी बाहेर देशातील अधिकाधिक कंपन्यांना आमंत्रण दिले जाईल. त्याच बरोबर “मेक इन इंडिया” योजनेमध्ये भारतात जास्तीत जास्त कंपन्यांची निर्मिती करण्यावर भर देण्यात येईल.

ज्या लोकांकडे राहण्यासाठी घर नाही, त्यांनाही माझे सरकार स्वस्त दरात घरे उपलब्ध करून देईल.

लोकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करणे

आपण पाहतो की दिवसेंदिवस अपराध व गुन्हे वाढत आहे. आपल्या देशाची कितीही प्रगती झाली किंवा सर्व सोयी सुविधा दिल्या तरी देशात सुरक्षिततेचे वातावरण असेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. सर्वप्रथम मी भारत देशाला भ्रष्टाचार मुक्त देश बनवण्यासाठी प्रयत्न करेल.

आपल्या देशातील प्रलंबित खटल्यांचा कायद्यात सुधार करून लवकरात लवकर निर्णय देऊन, गुन्हेगारांना शिक्षा देण्यात येईल. एक भयमुक्त सुरक्षित वातावरण बनवण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे, ज्यामुळे आपल्या देशातील कोणताही नागरिक कुठेही कोणत्याही वेळेला प्रवास करू शकतो.

आपल्या देशाबाहेरील शत्रू जसे अतिरेकी आणि फुटीरतावाद्यांना मदत करण्याऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. दहशतवाद्यांना फास्टट्रॅक कोर्टाद्वारे लवकरात लवकर फाशीची शिक्षा सुनावण्यात येईल. आपल्या देशावर कोणत्याही आतंकवाद्यांचा हल्ला होणार नाही या दृष्टीने सुरक्षा व कायद्यामध्ये सुधारणा करण्यात येईल.

निष्कर्ष

या सर्वांशिवाय मी जगातील सर्व देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करीन जेणेकरून संकटाच्या वेळी किंवा कोणत्याही आपत्तीच्या वेळी ते देश आपल्याला आणि आपण त्या देशांना मदत करू शकतो.

देशाची प्रगती होण्यासाठी सर्व देशांशी गुंतवणूक संदर्भात मी चर्चा करेल. आपला भारत देश एक सुखी आणि समृद्ध आणि सुरक्षित देश बनवण्याचा “जर मी पंतप्रधान झालो तर”…. माझा सदैव उद्देश व प्रयत्न असणार आहे.

🙏धन्यवाद.🙏

अंतिम शब्द

विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मित्र-मैत्रिणी व वर्ग मित्राबरोबर हा निबंध share करायला विसरू नका.👍

Leave a Comment