Pigeon Information in Marathi. kabutar chi mahiti Marathi. pigeon in Marathi.
कबूतर हा पक्षी सर्वांना खूप आवडतो कबूतर हा पक्षी दिसायला खूप सुंदर आहे खूप वर्षापासून कबूतर हा पक्षी माणसाच्या जवळ राहत आला आहे. कबूतर हा पक्षी खूप बुद्धिमान आहे. कबूतर हा पक्षी आवडीने पाळला जातो. कबूतर हा पक्षी शांत असल्यामुळे कबुतराला शांतीचा दूत असे सुद्धा म्हटले जाते.
कबूतर हा पक्षी आपल्या मालकाच्या खांद्यावर, डोक्यावर व हातावर आवडीने बसतो, इतका हा पक्षी माणसाळलेला आहे. हा पक्षी समूह प्रिय आहे, तो आपल्या इतर सवंगड्याबरोबर आकाशात विहार करणे, एकत्र उड्डाण करणे पसंत करतो. कबुतराच्या सुंदर दिसण्यामुळे कबुतराला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. कबूतर हा पक्षी दुर्मिळ प्रजातीचा पक्षी आहे.
वास्तव्य:
कबूतर हा पक्षी संपूर्ण भारतभर आढळतो, तसेच मलेशिया, आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर आफ्रिका व युरोप इत्यादी देशात सुद्धा आढळतो. कबूतर हा पक्षी स्वभावाने शांत आहे. पांढऱ्या रंगाचे कबूतर फार आवडीने पाळले जातात, तसेच स्लेटी व भुऱ्या रंगाचे कबूतर जंगलांमध्ये आढळतात. लहान मोठी शहरे, ग्रामीण भाग, शेतीचे प्रदेश, धान्याची गोदामे व जुन्या इमारती व ऐतिहासिक ठिकाणे, किल्ले अशा ठिकाणी कबुतरांचे वास्तव्य आढळते.
घरटे:
कबुतर हे आपले राहण्याचे ठिकाण उंच इमारतीवर बनवतात, वाळलेले गवत, काडी तसेच मिळेल ते साहित्य वापरून हे पक्षी आपले घरटे बनवतात.
प्रजाती:
संपूर्ण जगामध्ये कबुतराच्या एकूण 300 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात.
शारीरिक रचना:
कबूतराला एक चोच, दोन डोळे, दोन पंख, आणि दोन पाय असतात. कबूतर हा पक्षी गुंटर-गुंटर गु असा आवाज करतात. कबुतरांचा प्रजनन काळ वर्षातील बारा महिने आहे. एका वेळी दोन अंडी हे पक्षी देतात. कबूतराच्या डोळ्याचा रंग गुंजेसारखा लाल असतो. कबुतराचे शरीर गुबगुबीत असते व त्याच्या शरीरावरील पिसे दाट व मऊ असतात. रंगाने पांढरा शुभ्र असणाऱ्या पक्षाला कबूतर असे म्हणतात आणि पक्षी पारव्या रंगाचा असल्यास त्याला पारवा असे म्हणतात.
ऐतिहासिक महत्व:
प्राचीन काळामध्ये कबुतर हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेशाचे वहन करण्यासाठी, संदेश पोहोचवण्यासाठी उपयोगात आणले जात होते. पूर्वीच्या काळी राजे-महाराजे आपल्या राजवाड्यामध्ये कबूतर पाळत असत व आपल्या मोकळ्या वेळेत त्यांना आवडीने आपल्या हाताने धान्य चारत असत. प्रत्येक धार्मिक संस्कृतीमध्ये कबुतरांना विशेष महत्त्व आहे. कबुतरावर अनेक रचना, काव्य, गीते, कविता लिहिल्या गेल्या आहेत. अनेक प्राचीन, आधुनिक कथा-कादंबर्या गीतांमध्ये त्यांचे वर्णन आढळते.
अन्न:
कबूतर हा पक्षी शाकाहारी आहे ते धान्य, फळे इत्यादी प्रकारचे अन्न खातात.
Pigeon Information in Marathi
वैशिष्ट्य:
कबुतराचे एक वैशिष्ट्य आहे, ते बुद्धिमान असल्यामुळे कितीतरी मैलाचा प्रवास करून परत आहेत त्या ठिकाणी येऊन पोहोचू शकतात. कबुतराचे आयुष्य हे सहा ते दहा वर्षापर्यंत असते. कबूतर हा पक्षी ताशी 50 ते 70 किलोमीटर अंतर वेगाने उडू शकतो. कबूतर हा पक्षी स्वतःचे प्रतिबिंब आरशामध्ये सहजपणे ओळखू शकतो.
पूर्वीच्या काळी युद्धामध्ये कबुतराचा उपयोग गुप्त संदेश पाठवण्यासाठी केला जात असे. कबुतराची ऐकण्याची क्षमता खूप तेज आहे. भूकंप वादळ इत्यादी सारखी नैसर्गिक आपत्ती येण्यापूर्वी त्याची चाहूल आपल्या ऐकण्याच्या क्षमतेने कबूतर सहज ओळखते. कबूतर हा पक्षी हवेमध्ये सहजपणे कलाटणी घेऊ शकतो, त्यामुळे तो आपले शिकारी पक्ष्यांपासून, प्राण्यांपासून संरक्षण करू शकतो.
कबूतरांवरील संकट:
विजेचे खांब, दूरध्वनी यांचे टॉवर्स यांमधून निघणाऱ्या चुंबकीय लहरींमुळे कबुतर पक्षी मरण पावू लागले आहेत. वाढत्या आधुनिकीकरणामुळे कबुतरांना राहण्यास योग्य जंगल मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही, आणि झाडे, जंगले नष्ट होऊ लागली आहेत, त्यामुळे पुरेसे अन्न, निवारा, पाणी या प्राथमिक गरजा कमी पडू लागल्या आहेत. तसेच ध्वनि प्रदूषण, जलप्रदूषण आणि वायुप्रदूषण यांसारख्या वैश्विक समस्यांमुळे देखील कबुतरांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे, ही एक चिंतेची बाब आहे. पक्षी आहेत तरच निसर्गसृष्टी आहे.
Note: If you like the information shared in this post “Pigeon Information in Marathi. kabutar chi mahiti Marathi. pigeon in Marathi.” please share with your friends on social media.