लोकसंख्या वाढ एक समस्या निबंध Loksankhya Vadh Ek Samasya Essay

Loksankhya Vadh Ek Samasya Essay in Marathi/loksankhya essay in Marathi/loksankhya vispot in Marathi

वाढती लोकसंख्या हे आपल्या भारत देशासमोरील नव्हे तर संपूर्ण जगासमोरील सर्वात मोठी समस्या आहे. जगाचे क्षेत्रफळ जेवढे आहे तेवढेच आहे त्यात काहीच वाढ होत नाही पण लोकसंख्येची वाढ प्रत्येक वर्षी भरमसाठ होत चालली आहे. परिणामी लोकांना वास्तव्यासाठी जागा कमी पडू लागली आहे.

Loksankhya Vadh Ek Samasya Essay in Marathi
Loksankhya Vadh Ek Samasya Essay in Marathi

वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांच्या प्राथमिक गरजा भागवणे सरकारला सुद्धा अशक्य झाले आहे. जसे वीज पुरवठा, पाणी पुरवठा, राहण्यासाठी जागा, आरोग्याची सेवा इत्यादि सेवा उपलब्ध करण्यात सरकारला सुद्धा अडथळे येऊ लागले आहेत. मानव फार प्राचीन काळापासून निसर्गावर अवलंबून आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे मानव आपल्या वास्तव्यासाठी नवीन घरे बांधण्यासाठी झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करू लागला आहे, त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळू लागला आहे. लोकसंख्येच्या वाढीमुळे आरोग्य, शिक्षण, रोजगार, आणि वास्तव्य या सर्व प्राथमिक गरजांवर प्रचंड प्रमाणात ताण येऊ लागला आहे.

अन्नसाठा कमी पडू लागला आहे त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून सर्व अन्न धान्याचे हाइब्रिड डाइजेशन झाले आहे, हाइब्रिड डाइजेशन मुळे अन्नधान्याची गुणवत्ता संपुष्टात आली आहे, तसेच केमिकल च्या बेसुमार वापरामुळे अन्न अन्नधान्य विषारी बनले आहे.

सध्याचा माणूस बेजबाबदार बनला आहे, स्वत:च्या विनाशासाठी तो स्वत:च कारणीभूत ठरू लागला आहे.

वाढत्या लोकसंख्येचा परिणाम निसर्गातील सजीव निर्जीव घटकांवर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. मानव आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करू लागला आहे. वन्य प्राण्यांची तस्करी, जल प्रदूषणास कारणीभूत प्लॅस्टिकचा बेसुमार वापर, दुचाकी चारचाकी वाहनांचा विनाकारण मोठ्या प्रमाणात वापर, ध्वनि प्रदूषणास कारणीभूत साऊंड सिस्टम, या सर्व गोष्टींमुळे निसर्गाची हानी होऊ लागली आहे.

Loksankhya Vadh Ek Samasya Essay in Marathi
Loksankhya Vadh Ek Samasya Essay in Marathi

मानव सृष्टी ही फक्त पृथ्वीवरच आढळते, पृथ्वीवर 71% पाणी तर 29% जमीन आहे, 29% जमीनीतील काही भाग शेतीसाठी वापरण्यात आला आहे तर शिल्लक भागावर मनुष्य वस्ती आढळते, भविष्यामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांना राहण्यास जागा कमी पडेल, सध्या सगळीकडे तीच परिस्थितीत आढळते आहे. जागांच्या किमंती गगनाला भिडू लागल्या आहेत.

सध्या शेतजमिनीचे सुद्धा फ्लोटिंग होऊ लागले आहे शेत जमिनी सुद्धा मनुष्याच्या वास्तव्यासाठी उपयोगात आणल्या जगू लागल्या आहेत, परिणामी नैसर्गिक साधन संपती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दिवसेंदिवस लोकसंख्येचा दर वाढू लागला आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे असाध्य रोगांवर सुद्धा मानवाला मात करता आली आहे परिणामी मृत्यू दराचे प्रमाण कमी झाले आहे आणि जन्मदराचे प्रमाण वाढू लागले आहे. 2001 साली भारताची लोकसंख्या 1.03 billion (1,027,015,247) इतकी होती. तर 2020 रोजी भारताची लोकसंख्या (1,380,004,385) इतकी आहे.

लोकसंख्या वाढीची कारणे:

वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती: विज्ञानाच्या जोरावर मानवाने स्वतचे जीवन सुखकर केले आहे आणि दिवसेंदिवस तो विविध क्षेत्रामध्ये विज्ञानाच्या जोरावर आपली प्रगती करू लागला आहे.

विज्ञानाच्या आधारे मानवी जीवन धोक्यात आणणार्‍या अनेक समस्यांवर मानवाने विजय मिळवला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील क्रांती मुळे मानवाने असाध्य अशा रोंगावर मात केली आहे त्यामुळे मानवाचे आयुष्य वाढले आहे.

अशिक्षितपणा:

लोकसंख्या वाढीस हे सुद्धा एक महत्वपूर्ण कारण बनले आहे. आपल्या भारत देशामध्ये प्राचीनकाळापासून मुलागा मुलगी हा भेदभाव आहे. वंशाला मुलगा नसेल तर ते वैवाहिक जीवन अपूर्ण समजले जाते, मग मुलगा जन्माला घालण्यासाठी अगोदर अनेक अपत्यांना जन्माला घातले जाते.

अशिक्षितपणामुळे कुटुंब नियोजनाकडे लक्ष दिले जात नाही, भविष्याचा विचार केला जात नाही, अशिक्षितपणामुळे व्यसन, वाईट संगत अशा प्रकारच्या गोष्टींच्या आहारी जाऊन अनेक अपत्ये जन्माला घातली जातात.

बाल विवाह: समाजामध्ये आपण पाहतो काही समाजामध्ये मुलाचे मुलीचे लग्न कमी वयामध्ये असतानाच लावली जातात. परिणामी लोकसंख्या वाढीस चालना मिळते.

उपाय:

सरकारने लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोरत कठोर पावले उचलली पाहिजेत, त्याचबरोबर मुलगा मुलगी हा भेदभाव समाजातून नष्ट व्हायला पाहिजे. लोकसंख्या वाढ ही एक समस्या या मुद्यावर समाजामध्ये प्रबोधन होणे गरजेचे आहे. लैंगिक शिक्षण, कुटुंब नियोजन हे प्रत्येकाच्या अभ्यासाचा विषय होणे गरजेचे आहे.

सूचना: जर तुम्हाला Loksankhya Vadh Ek Samasya Essay in Marathi हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

Leave a Comment