Essay on Nature in Marathi, Essay on nisarg in Marathi.
अश्मयुगापासून मानवाचे आणि निसर्गाचे नाते अतूट राहिले आहे. निसर्ग हा मानवाचा मित्र आहे. निसर्गाने मानवाला भरपूर काही दिले आहे. सजीवाच्या जगण्याचा आधार हा निसर्गच आहे. जगण्यासाठी ज्या मूलभूत गरजा सजीवासाठी गरजेच्या असतात त्या सर्व निसर्गातूनच प्राप्त होतात, जसे अन्न, वस्त्र, निवारा, ऊन, वारा, पाऊस, औषधी वनस्पति इत्यादि.
निसर्गामध्ये तीन ऋतु आढळतात, उन्हाळा, पावसाळा, आणि हिवाळा. उन्हाळा हा कडक उन्हाचा, उष्ण वातावरणाचा ऋतु असतो, हिवाळा हा थंडीचा ऋतु असतो तर पावसाळा हा मेघधारांचा, पाऊसाचा ऋतु असतो. आपल्या भारत देशात प्रत्येक ऋतु मध्ये वेगवेगळी पिके घेतली जातात.
मानवाला त्याच्या रोजच्या जीवनामध्ये आवश्यक असणार्या गोष्टी फळे, फुले, पाने, डिंक, आणि लाकूड अश्या अनेक वस्तु निसर्गातूनच प्राप्त होतात. झाडापासून मिळणार्या लाकडापासून मानव स्वत:साठी घर बनवू लागला आहे तसेच फळे, फुले, पाने यांपासुन तो औषधी पेये, सौंदर्य प्रसाधने बनवू लागला आहे. आयुर्वेद शास्त्र हे पुर्णपणे निसर्गामध्ये उपलब्ध असलेल्या औषधी वनस्पतींवर अवलंबून आहे. निसर्गातील झाडे मानवाला शुध्द ऑक्सिजन पुरवतात.
किलबिलणारे पक्षी, खळ खळ वाहणारा झरा, नदी, नाले, ओढे, उंच वृक्ष, रंगबेरंगी फुले, फळे, हिरवीगार पाने, डोंगर, दर्या, पर्वत, महासागर, समुद्र, सुंदर पक्षी जसे पोपट, मोर, सुतार पक्षी, गान कोकिळा हे सर्व निसर्गाचीच ओळख आहे. मानवाचे शरीर हे हवा, पाणी, अग्नी, आकाश, आणि पृथ्वी या निसर्गातील पंचमहाभूतांपासून बनले आहे.
Essay on Nature in Marathi
सजीवाच्या शारीरिक व मानसिक विकासामध्ये निसर्गातील मौल्यवान गोष्टींचा मोठा वाटा आहे. निसर्ग हा मानवाची प्रत्येक गरज पूर्ण करतो पण मानवाने स्वत:च्या अस्तित्वासाठी, व वाढत्या हव्यासापोटी जवळ जवळ निसर्ग सृष्टी नष्ट करत आणली आहे.
खाणकाम, वाळू उपसा, वृक्षतोड, प्राण्यांची हत्या, उद्योगधंद्यामुळे, मोटारी वाहनांमुळे होणारे वायु प्रदूषण, जल प्रदूषण ह्या सर्व मानवनिर्मित गोष्टीमुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होऊ लागली आहे.
मानव निसर्गाची हानी करून स्वत:च्या पायावर स्वत:च कुर्हाड मारून घेऊ लागला आहे, तो हे विसरून चालला आहे की जसे आपले घर आपले घर आहे तसे निसर्ग सुद्धा आपल्या सर्वांचे घर आहे. मानवाने निसर्गातीला अनेक महत्वपूर्ण घटकांवर अनेक उद्योग धंदे उभारले आहेत.
झाडांपासून रबर निर्मिती, औषध निर्मिती, फर्निचर निर्मिती, लाकडी शोभेच्या वस्तु निर्मिती, नदीच्या समुद्राच्या पाण्यापासून वीज निर्मिती, हवे वर चालणार्या पवन चक्की पासून वीज निर्मिती, खाणकामातून कोळसा, खनिजे निर्मिती असे अनेक महत्वपूर्ण उद्योग धंदे मानवाने निसर्गातून मिळणार्या कच्च्या सामग्रीवर उभारले आहेत.
मासेमारी, पशुपालन, मातीपासून वीट निर्मिती असे अनेक छोटे मोठे उद्योग धंदे सुद्धा निसर्गातील साधन सामग्रीवर उभारले गेले आहेत. निसर्गातील सुंदर दृश्ये मानवाला निसर्गाकडे आकर्षित करतात. निसर्गातील सुंदर दृश्यांमुळे जगभरात पर्यटन क्षेत्राचा खूप विकास झाला आहे.
जगभरातील अनेक निसर्गनिर्मित आश्चर्य पाहण्यासाठी मानव जगभर प्रवास करू लागला आहे त्यामुळे त्या त्या देशाचा आर्थिक विकास होण्यास मदत होऊ लागली आहे. निसर्गातील हिरवळ, रंगबेरंगी फुले, फळे, पाने आणि वेली हे मानवाचा मानसिक ताण तणाव दूर करण्यास मदत करते.
आधुनिकीकरणासाठी मानवाने निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी केली आहे, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, ध्वनि प्रदूषण, वायु प्रदूषण, आणि जल प्रदूषण हे सर्व त्याचीच उदाहरणे आहेत. मानवाने स्वत:च्या सुखासाठी सोयीसाठी निसर्गाची हानी तर केलीच पण त्यामुळे इतर प्राण्यांचे जीवन सुद्धा धोक्यात आणले आहे. निसर्गातील सुंदर पक्षी, उपयोगी झाडे, उपयोगी प्राणी यांचे प्रमाण सुद्धा कमी होऊ लागले आहे.
आपले जीवन सुखकर आणि निरोगी ठेवण्यासाठी तसेच पुढच्या पिढीसाठी आपण निसर्गाचे जतन केले पाहिजे, निसर्गातील साधन संपतीची जपणूक केली पाहिजे, वायुप्रदूषणास, जल प्रदूषणास, आणि ध्वनि प्रदूषणास करणीभूत वस्तूंचा वापर कमी केला पाहिजे अन्यथा पुर्णपणे टाळला पाहिजे.
सूचना: जर तुम्हाला Essay on Nature in Marathi, Essay on nisarg in Marathi. हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा