sutrasanchalan in marathi, सूत्रसंचालन कसे करावे, सूत्रसंचालन चारोळया, सूत्रसंचालन चारोळी, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नमुना pdf download, सूत्रसंचालन चारोळ्या मराठी, sutrasanchalan script in marathi,
Topics
सूत्र संचालन म्हणजे काय? Sutrasanchalan in Marathi
सूत्र संचालन हा शब्द सूत्र आणि संचालन या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. सूत्र या शब्दाचा अर्थ सूत, नियम व तत्व असा होतो तर संचालन या शब्दाचा अर्थ धोरण अमलात आणणे असा होतो. ,
सूत्र संचालन हे कार्यक्रमाच्या व्यवस्थापनातील मुख्य भाग आहे. कार्यक्रम पूर्णत्वास नेण्याची मुख्य जबाबदारी सूत्र संचालकाकडे असते. कार्यक्रमातील सर्व घटक क्रमानुसार सादर कंरण्याचे काम सूत्र संचालक करत असतो, म्हणजेच संपूर्ण कार्यक्रम एकाच धाग्यात गुंफन्याचे काम सूत्र संचालक करत असतो.
सूत्र संचालकाच्या हातात कार्यक्रमाची सर्व सूत्रे असतात म्हणून त्याला सूत्र संचालक म्हणतात. सूत्र संचालन म्हणजे फक्त नावाची पुकारणी नव्हे तर सूत्र संचालन हे कार्यक्रमाला सुत्रबद्धपणा मिळवून देत असते.
सूत्र संचालन करणे ही एक उत्तम कला आहे. उत्तमरित्या सूत्र संचालन करण्यासाठी ही कला आत्मसात करून घेणे अतिशय गरजेचे आहे.
वाचकांनो आज आपण या ठिकाणी सुत्रबद्धपणे प्रभावी सूत्रसंचालन कसे करावे, (sutrasanchalan in marathi) याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत व काही सुंदर सूत्रसंचालन चारोळी सुद्धा पाहणार आहोत.
सूत्र संचालनाचे प्रकार
1. प्रबोधन/व्याख्यान
2. वार्षिक स्नेहसंमेलन (गॅदरिंग)
3. विवाह सोहळा
4. साखरपुडा सोहळा
5. राजकीय सभा
6. साहित्य संमेलन
7. बैठक (मीटिंग)
8. शोक सभा
9. सत्कार समारंभ
10. संगीत कार्यक्रम
11. वाढदिवस सोहळा
12. निरोप समारंभ
13. शासकीय कार्यक्रम
14. सांस्कृतिक कार्यक्रम
सूत्र संचालनासाठी महत्वाच्या बाबी
सूत्र संचालन करण्यापूर्वि ज्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे त्या गोष्टी खाली नमूद केल्या आहेत.
1. कार्यक्रमापूर्वी कार्यक्रम पत्रिका तयार करावी.
2. कार्यक्रमाचे स्वरूप लक्षात घ्यावे.
4. मनोगत व्यक्त करणार्या लोकांची यादी तयार करावी.
5. योग्य चारोळ्यांचा योग्य वेळी वापर करावा.
6. कार्यक्रमाचा वेळ, स्थान व कार्यक्रमाचे आयोजक यांच्या विषयी माहिती घ्यावी.
6. कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण आहेत, प्रमुख पाहुणे कोण आहेत, सत्कार मूर्ति कोण आहेत, येणारे विविध क्षेत्रातील मान्यवर कोण आहेत यांची लिस्ट तयार करावी व या सर्वांचे त्यांच्या क्षेत्रातील पद, कार्य यांची थोडक्यात माहिती टिपून घ्यावी.
7. प्रेक्षकांना टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचे व पाहुण्यांचे स्वागत करण्यास विनंती करावी.
सूत्र संचालन चारोळ्यांचे प्रकार
सूत्र संचालन करत असताना योग्य प्रसंगी योग्य चारोळ्यांचा वापर करावा. खाली सूत्र संचालन चारोळ्यांचे प्रकार दिले आहेत यावरून तुमच्या लक्षात येईल कि तुमच्या जवळ असलेल्या चारोळया संग्रहातील कोणीती चारोळी कोणत्यावेळी वापरावी.
1. कार्यक्रमाच्या सुरुवातीची स्वागताची चारोळी
2. सत्कारावेळीची चारोळी
3. कार्यक्रमात टाळ्या मिळवण्यासाठीची चारोळी
4. अभिवादन करण्यासाठी चारोळी
5. मान्यवरांच्या भाषणाआधीची चारोळी
6. आभार प्रदर्शन सादर करतानाची चारोळी
सूत्र संचालकाचे कार्य
कार्यक्रम सुरू करणे, प्रमुख पाहुणे, अध्यक्ष व मान्यवरांना मंचावर आमंत्रित करणे, पाहुण्यांचे स्वागत करणे, मुख्य कार्यक्रम पार पाडणे (भाषण, बक्षीस वितरण, मनोगत).
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नमुना कार्यक्रमपत्रिका
लेखी स्वरुपात कार्यक्रमपत्रिका लिहून काढावी म्हणजे कार्यक्रमाला योग्य दिशा देता येते. कार्यक्रमपत्रिका तयार केल्याने कार्यक्रमाचा एकही टप्पा विसरला जात नाही.
1. कार्यक्रम आयोजन करणार्या संस्थेचे नाव
2. कार्यक्रमाचे शीर्षक (उदा. भव्य बक्षिस वितरण समारंभ)
3. कार्यक्रमाचे अध्यक्ष (नाव, पद, थोडक्यात कार्य)
4. कार्यक्रमाचे उद्घाटक (नाव, पद, थोडक्यात कार्य)
5. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे (नाव, पद, थोडक्यात कार्य)
6. प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन
7. स्वागताचा कार्यक्रम
8. पाहुण्यांचे भाषण
9. समारोप
10. आभार मानण्याचा कार्यक्रम
11. कार्यक्रमाची सांगता
12. या ठिकाणी सूत्र संचालकाचे नाव नमूद करावे.