श्री नवनाथांच्या समाध्या विषयी संपूर्ण माहिती ( navnath samadhi )

नवनाथ ( navnath ) हा नऊ सिद्ध योगींना नवनाथ म्हणतात. या नऊ सिद्धांची नावे. गोरखनाथ,जालिंदरनाथ, नागनाथ,मच्छिद्रनाथ,गहिनीनाथ, आणि कानिफनाथ.चक्षपदीनाथ,रेवणनाथ, भरतनाथ,
Navnath samadhi

श्री नवनाथांच्या ( navnath samadhi ) संजीवनी समाधी विषयी संपूर्ण माहिती….

1) . मच्छिंद्रनाथ समाधी ( machindranath samadhi ):- बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील श्री क्षेत्र मायंबा येथे नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी आहे या समाधीच्या दर्शनासाठी गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री विविध ठिकाणाहून कावडीने आणलेल्या गंगेच्या पाण्याने समाधीला स्नान घातले जाते यासाठी मच्छिंद्रनाथांची समाधी वर्षातून एकदाच उघडली जाते त्यामुळे देशभरातील भाविक लाखोंच्या संख्येने येथे दर्शनासाठी येत असतातमायंबा येथील मच्छिंद्रनाथांचा यात्रा उत्सव पाडव्या दिवशी चालू होतो. त्यादिवशी वर्षातून एकदा मच्छिंद्रनाथांची समाधी दर्शन साठी उघडली जाते.

2) जालिंदरनाथ समाधि ( jalidharnath samadhi ): – जालिंदरनाथ यांची समाधी बीड जिल्ह्यामध्ये शिरूर तालुकामध्ये येवलेवाडीमध्ये जालिंदरनाथ यांची संजीवनी समाधी आहे.

3) #कानिफनाथ समाधी ( kanifnath samadhi ): नवनाथांपैकी कानिफनाथ यांचा जन्म हत्तीच्या कानामधून झालेला आहे. त्यामुळे त्यांचे नाव कानिफनाथ असे पडले. कानिफनाथ यांची समाधी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये मढी या गावांमध्ये आहे.

4) #भर्तृरिनाथ समाधी ( bhartrinath samadhi ):- भरतनाथ यांची समाधी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या तालुक्यामध्ये हरंगुळया गावांमध्ये आहे. नागपंचमीला येथे सर्वात मोठी यात्रा भरते. तसेच देशभरातून अनेक भक्त या समाधीला दर्शन घेण्यासाठी येतात.

5) #रेवणनाथ समाधि ( revannath samadhi ): नवनाथांपैकी सर्व सिद्धी प्राप्त असणारे रेवनाथ आहेत. रेवनसिद्धीनाथ यांची समाधी सांगली जिल्ह्यातील विटा विटा ह्या तालुक्यामधील रेवणी या गावामध्ये आहे. रेवनाथ सिद्धीनाथ या गावाला रेवानी असे नाव पडले आहे. या गावात 100 दशके पासून गावामध्ये कोणत्याही प्रकारचं मांसाहारी सेवन केल जात नाही. आणि गुरुवार आणि अमावस्येला येथे प्रचंड गर्दी असते.

Navnath samadhi

6) #वटसिद्ध_नागनाथ समाधी ( nagnath samadhi ):– श्री नागनाथ यांची समाधी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वडवळ या ठिकाणी आहे. ही समाधी अतिशय प्राचीन असून व पौर्णिमेला भक्तांची प्रचंड गर्दी होते.

7) #गहिनीनाथ समाधी ( gahininath samadhi ):- गहिनीनाथ यांची समाधी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये चिंचोली या गावांमध्ये आहे. जिथे समाधी आहे त्या गडाला तेथे गहिनीनाथ गड असे म्हणतात. गहिनीनाथ नाथांची समाधी एका वड्याच्या झाडाखाली आहे. त्या वड्याच्या झाडाला आता सध्या 1000 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहे. तरी ते झाड जसं तसाच आहे. गहिनीनाथ हे निवृत्तीनाथ यांचे गुरु होते.

8) गोरक्षनाथ समाधि ( gorakshanath samadhi ): गोरक्षनाथ यांची समाधी गोरक्षनाथ गडावरती आहे हा गड अहमदनगर जिल्ह्यातील मांजरसुभा या गावापासून चार किलोमीटर अंतरावर ती गोरक्षनाथ गड आहे. त्या गडावरती गोरक्षनाथ यांची समाधी आहे. ही समाधी पूर्णपणे दगड आणि रेखीव मध्ये असूनअतिशय प्राचीन अशी आहे.

9) #चिपटीनाथ (chaptinath samadhi ) :- यांची समाधी पारनेर तालुक्यातील वनकुटे या गावांमध्ये आहे.

नवनाथ कथासार ( navnath kathasar ) नवनाथ कथासार ( navnath kathasar ) हा नवनाथ सिद्धांच्या जीवनकथांवर आधारित प्रसिद्ध ग्रंथसंग्रह आहे. नवनाथ हा नऊ सिद्ध योगी संतांचा एक समूह आहे, ज्यांना भक्ती ग्रंथांमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. l नवनाथ सिद्धांचे जीवन आणि शिकवण संकलित करते, जे सामान्य लोकांना त्यांच्या जीवनातील परिस्थितींचा सामना करण्यासाठी आध्यात्मिक ज्ञान आणि पद्धतींद्वारे मदत करतात.

नवनाथ कथासार मध्ये नवनाथ सिद्धांव्यतिरिक्त त्यांचे शिष्य, भक्त आणि इतर आध्यात्मिक संतांच्या कथा समाविष्ट आहेत. हे पुस्तक कादंबरीच्या स्वरूपात लिहिलेले आहे आणि वाचकांना आध्यात्मिक शहाणपण, मोक्ष आणि नैतिक संदेश प्रदान करते. नवनाथ कथासार हा हिंदी साहित्यातील प्रसिद्ध ग्रंथ मानला जातो आणि तो आध्यात्मिक अभ्यास आहे.

Leave a Comment