लग्नपत्रिकेतील चारोळया Marathi Lagna Patrika Wordings Kavita

Marathi lagna patrika wordings kavita, marathi lagna patrika majkur, marathi lagna patrika matter in word format, lagna patrika matter in marathi.

लग्न पत्रिकेतील मजकूर व चारोळया जर सुंदर आकर्षक व मनाला स्पर्श करणार्‍या असतील तर लग्न पत्रिका अधिक खुलून दिसते. मित्रांनो जर तुम्ही अशाच काही सुंदर आकर्षक Marathi lagna patrika wordings kavita, Marathi lagna patrika matter majkur in word format चारोळया शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आज आपण या पोस्ट मध्ये अश्याच काही सुंदर चारोळया पाहणार आहोत.  

लग्नपत्रिकेतील अप्रतिम चारोळया

 Marathi Lagna Patrika Wordings Kavita

विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन,
सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात नवजीवनात आज केलेले पर्दापण,
सुख स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलन, सासर आणि माहेरच्या
नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण यासाठी हवा शुभ-आशिर्वाद
व शुभेच्छाची सुखद रम्य पाखरं म्हणूनच या शुभ विवाह सोहळ्याचे
आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.

vivah mhanje don jivanche milan,
sanai choughdyachya manjul swarat
navjivnat aaj kelele pardapan, sukh
swapnanchya paklyanche najuk unmilan,
sasar aani maherachya natyanchi
mangalsutrat keleli pavitra gunfan
yasathi hava shubh ashirvad va
shubhechachi sukhad ramya pakhar
mhanunach ya shubh vivah sohalyache
aapana sarvana agrahache nimantran.

 Marathi Lagna Patrika Wordings Kavita

एक क्षण मंगल प्रहराचा, एक क्षण मेहंदीच्या बहराचा,
एक क्षण लगीन घाईचा, एक क्षण शुभ शहनाईचा,
एक क्षण जन्मासाठीचा, एक क्षण लग्नगाठीचा.

ek kshan mangal praharacha,
ek kshan mehandichya baharacha,
ek kshan lagin ghaicha, ek kshan
shubh shahanaicha, ek kshan
janmasathicha, ek kshan lagngathicha.

लग्न म्हणजे काय असतं दोन मनांचं जुळण असतं,
तहानलेल्या सागराचे नदीला येऊन मिळण असतं.
लग्न म्हणजे काय असतं पाहुणेरावळे यांची लगबग असते,
कार्य सुरळीत पार पाडण्याची माय बापाची तगमग असते.

lagn mhanje kay asat don manach
julan asat, tahanlelya sagarache
nadila yeun milan asat. lagn
mhanje kay asat pahuneravale
yanchi lagbag aste, karya surlit
par padnyachi maay bapachi tagmag
asate.

ती म्हणजे समईतील ज्योत, तर तो म्हणजे चांदण्याचा प्रकाश.
ती म्हणजे अथांग सागर, तो म्हणजे निळे आकाश.
ती म्हणजे बासरीचा सूर, तो म्हणजे भूपाळीची तान.
ती म्हणजे घराचे घरपण, तो म्हणजे घराचा मान.
तिच्या त्याच्या एकोप्याने बनत असत घर.
तिच्या त्याच्या विवाहाला शुभेच्छा आहेत आभाळभर.

ti mhanje samaitil jyot,
tar to mhanje chandnyacha
prakash. ti mhanje athang
sagar, to mhanje nile akash.
ti mhanje basaricha sur,
to mhanje bhupalichi taan.
ti mhanje gharache gharpan,
to mhanje gharacha maan.
tichya tyachya ekopyane banat
asat ghar. tichya tyachya vivahala
shubheccha aahet abhalbhar.

Marathi Lagna Patrika Wordings Kavita Majkur

लग्नपत्रिकेतील खास आमंत्रणासाठी लिहला जाणारा मजकूर ज्यामध्ये वार दिनांक मुहूर्त यांचा उल्लेख असतो.

१. मिती अश्विन बुधवार दिनांक. ०४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी या शुभमुहूर्तावर विवाहबद्ध होत आहेत. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. हा आमचा कौटुंबिक जीवनातील आनंदाचा सोहळा दारी मंडपी प्रकाश ज्योतींच्या झगमगाटाने सजलेल्या सनई ताशाच्या व सुरांनी गजबजलेल्या या पवित्र सोहळ्यास आपले गंधबोट लावून शुभ शब्दांची उधळण व्हावी. वधू-वरास अतूट बंधनात बांधण्यात यावे. आशीर्वाद व शुभेच्छा घेऊन येणारे आपल्यासारख्या आप्तस्वकीयांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला आनंदाची गोडी नक्कीच वाढेल म्हणूनच हे आग्रहाचे आमंत्रण.

२. मिती अश्विन बुधवार दिनांक. ०४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. या मंगल समयी वधू वरास शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपली सहकुटुंब सहपरिवार उपस्थिती प्रार्थनीय आहे.

३. या शुभमुहूर्तावर सनईच्या मंजूळ स्वरात मंत्रघोषात आणि अक्षतांच्या वर्षावात विवाहबद्ध होत आहेत. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत तरी या मंगल प्रसंगी आपल्या आशीर्वादाने आणि शुभेच्छांनी हे बंधन होणार आहे तेव्हा सर्व मित्रमंडळी व नातेवाईक यांनी सह परिवारासह उपस्थित रहावे ही नम्र विनंती.

४. एका नवदांपत्याचा सहजीवनाचा नूतन प्रवास शुभारंभ होतोय. कुलस्वामिनीच्या कृपेने अग्नी देवतेच्या साक्षीने श्री गणेशाच्या आशीर्वादाने त्यांची ही वैवाहिक जीवनाची वाटचाल सुरू होत आहे. तरी आपले शुभ आशीर्वाद मौल्यवान आहेत. आपण सह परिवारासह उपस्थित रहावे हे अगत्याचे आमंत्रण.

५. मिती अश्विन बुधवार दिनांक. ०४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी या मंगल मुहूर्तावर करण्याचे योजले आहे. या अक्षय बंधनाच्या शुभप्रसंगी आपल्या सारख्या वरिष्ठांचे मंगल आशिर्वाद आणि मित्रमंडळीच्या शुभेच्छा यांच्या बळकट आधारावर दोन जीवांच्या मधुर मिलनाचा प्रसंग निश्चित करीत आहोत. या शुभ प्रसंगी आपण सहकुटुंब आणि मित्रमंडळीसह आल्यानंतर या सोहळ्यास लागणारे पूर्णत्व हे निश्चितच सुखद क्षणांची बरसात तसेच आम्हा सर्वांसाठी आनंदाची पर्वणी होय. आमच्या विनम्र व हार्दिक आमंत्रणाचा स्वीकार करावा.

आम्हाला आशा आहे की आपणास या पोस्टमधील Marathi lagna patrika wordings kavita, Marathi lagna patrika matter majkur in word format चारोळया आवडल्या असतील, त्यामुळे ह्या चारोळया नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment