महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे, 5 प्रादेशिक विभाग नावे

महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे: सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक अशा सगळ्यांचा समृद्ध वारसा लाभलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य होय. महाराष्ट्र राज्यात साधू संत, छत्रपती शिवराय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबडेकर, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी आण्णा कर्वे यांसारख्या थोर समाज सुधारकांनी अपार बदल घडवून आणले. महाराष्ट राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात बंधुता, समानता, देशप्रेम आणि एकता वाढीस लावण्यासाठी या थोर मंडळींनी अपार कष्ट घेतले.

30 एप्रिल 1960 रोजी पंडित नेहरूंनी महाराष्ट्र राज्याची घोषणा केली आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.

महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे

महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे

1. औरंगाबाद19. नाशिक
2. बीड20. उस्मानाबाद
3. भंडारा21. परभणी
4. अहमदनगर22. नागपूर
5. अकोला23. नांदेड
6. अमरावती24. नंदुरबार
7. गडचिरोली25. सांगली
8. गोंदिया26. सातारा
9. हिंगोली27. सिंधुदुर्ग
10. लातूर28. वाशिम
11. मुंबई उपनगर29. यवतमाळ
12. मुंबई शहर30. पालघर
13. जळगाव31. सोलापूर
14. जालना32. ठाणे
15. कोल्हापूर33. वर्धा
16. बुलढाणा34. पुणे
17. चंद्रपूर35. रायगड
18. धुळे36. रत्नागिरी

महाराष्ट्र प्रादेशिक विभाग

महाराष्ट्र राज्याची विभागणी एकूण पाच प्रादेशिक विभागात केली आहे.

1. विदर्भ 2. मराठवाडा 3. खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र 4. कोकण 5. पश्चिम महाराष्ट्र

1. अ) विदर्भ (अमरावती विभाग)    ब) विदर्भ (नागपूर विभाग)    2. मराठवाडा  3. खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र  4. कोकण  5. पश्चिम महाराष्ट्र  
अमरावतीनागपूरऔरंगाबादअहमदनगरमुंबई शहरपुणे
बुलढाणावर्धाबीडजळगावमुंबई उपनगरसातारा
यवतमाळ भंडाराजालनानंदुरबारठाणेसांगली
वाशिम गोंदियाउस्मानाबादनाशिकपालघरसोलापूर
अकोलाचंद्रपूरलातूरधुळेरत्नागिरीकोल्हापूर 
 गडचिरोलीनांदेड रायगड 
  हिंगोली सिंधुदुर्ग  
  परभणी   

संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना

3 फेब्रुवारी 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी या समितीची स्थापना करण्यात आली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनाचे घोषवाक्य “मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” हे होते. या चळवळीत सेनापति बापट, क्रांतीसिंह नाना पाटील, अहिल्याबाई रांगणेकर व लालजी पेंडेसे यांनी मोलाचे योगदान दिले.

ज्यावेळी मुंबई महाराष्ट्र राज्याला मिळणार नाही हे स्पष्ट झाले होते त्यावेळी प्रचंड जन आंदोलन उभे राहिले होते. मोरारजी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांवर गोळीबार केला. या गोळीबारात 106 लोक हुतात्मा झाले.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

1. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता

अहमदनगर

2. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता

मुंबई शहर

3. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे?

मुंबई

4. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे?

नागपुर

5. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते

यशवंतराव चव्हाण

6. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे

3 लाख 7 हजार 713 चौ. कि.मी. आहे. (307,713 km²)

7. महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी किती

720 कि.मी.

8. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती

800 कि.मी.

9. महाराष्ट्र राज्याच्या शेजारील राज्यांची नावे

उत्तर-पूर्व:- छत्तीसगढ, मध्यप्रदेश

दक्षिण:- कर्नाटक, गोवा.

वायव्य:- गुजरात, दादरा नगर हवेली (केंद्रशासित प्रदेश),

10. महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय विभाग किती आहेत.

6 आहेत. कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपुर व अमरावती.

11. महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग कोणते

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खानदेश.

12. महाराष्ट्र मध्ये एकूण जिल्हे किती आहेत.

36

13. महाराष्ट्र महानगरपालिका किती आहेत

28

14. महाराष्ट्र नगरपालिका किती आहेत

236

15. महाराष्ट्रात किती तालुके आहेत

358

Leave a Comment