[Best] सत्कार समारंभ सूत्रसंचालन नमूना, सत्कार समारंभ चारोळ्या

सत्कार समारंभ सूत्रसंचालन नमूना, Satkar Samrambh Anchoring script in Marathi, सत्कार समारंभ चारोळ्या: शांळामध्ये, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, गल्लीमध्ये विविध सत्काराचे कार्यक्रम पार पडत असतात जसे गुणगौरव सोहळा, साठीचा सोहळा, यश संपादन, पदोन्नती, वर्धापन दिन, खेळांडुचा सत्कार, गुणवंतांचा सत्कार, सेवानिवृत्ती कार्यक्रम तर अश्या कार्यक्रमाचे सत्कार समारंभ सूत्रसंचालन कसे करावे हे आपण या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत, शिवाय कार्यक्रमाची शोभा वाढवणार्‍या काही सुंदर अशा सत्कार समारंभ चारोळ्या सुद्धा पाहणार आहोत.

सत्कार समारंभ सूत्रसंचालन नमूना

सत्कार समारंभ सूत्रसंचालन

मित्रांनो सत्कार समारंभ opening पासून पुढे कसा न्यायचा हे खाली step by step दिले आहे. सत्कार समारंभ कार्यक्रम पुढे नेताना खाली दिलेल्या अंकाचा अनुक्रम फॉलो करा.

1. सूत्र संचालन करणार्‍या व्यक्तीने सर्वप्रथम कार्यक्रमाची ओळख करून द्यायची आहे.

काही माणसे आपल्या स्वकृत्वाने आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या कार्य कर्तुत्वाने एक वेगळा ठसा उमटवितात आणि त्यापैकीच एक आपल्या गावचे/डिपार्टमेंटचे/शाळेचे माननीय श्री ……………….जी यांची …………….या पदी निवड/पदोन्नती झाल्याबद्दल आज आपण त्यांचा सत्कार(सन्मान) समारंभ आयोजित केलेला आहे.

या सत्कार सोहळ्याच्या निम्मीताने माननीय श्री …………यांच्या शुभ हस्ते व इतर क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सत्कार समारंभ पार पडणार आहे. मी ………………(सूत्रसंचालकाचे नाव) माननीय श्री …………..व मित्र परिवार यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे.

2. पाहुण्यांना व्यासपीठावर आमंत्रित करणे

अ. चारोळी म्हणावी “परिश्रमाने कार्य ज्यांचे बहरले आले फळा, सत्काराच्या पुष्पमाला अर्पूया त्यांच्या गळा.” (तुमच्या आवडीची कोणतीही एक दोन चारोळी या ठिकाणी वापरू शकता.)

ब. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय श्री ……………हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो.

क. आपले आजचे आदरणीय सत्कार मूर्ती श्री ……………….व्यासपीठावर त्यांचे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो.

ड. तसेच प्रमुख पाहुणे आदरणीय श्री ………………..हे व्यासपीठावर त्यांचे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनती करतो.

6. सरस्वती पूजन, महापुरूषांचे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना मी विनंती करतो कि त्यांनी सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करावे.

7. चारोळी

चारोळी म्हणावी “आपल्या या आगमनाने हर्ष मनी तो दाटला, प्रांगणी हा गोतावळा बघा सत्कारास तो जमला.” 

8. अध्यक्षांचे स्वागत

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री ……………….यांचे स्वागत आदरणीय श्री ………………… हे शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन करतील. यांना मी विनंती करतो.

9. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत

आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री ………………यांचे स्वागत आदरणीय श्री ……………………. हे शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन करतील. यांना मी विनंती करतो.

10. चारोळी

चारोळी म्हणावी “प्रत्येक यशाचे पाऊल ज्यांच्याकडे वळते, जीवन कसे जगावे ज्यांना पाहून कळते, प्रत्येक सत्कार्याला ज्यांचे पाठबळ मिळते, कर्तव्य म्हणजे काय हे ज्यांना पाहून कळते.”

11. यानंतर कार्यक्रमाच्या मुख्य व्यक्तीचा (सत्कार मूर्तीचा) सत्कार अध्यक्षांच्या हस्ते करावा.

आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय सत्कार मूर्ती श्री …………………यांचे स्वागत कार्यक्रमाचे अध्यक्षआदरणीय श्री ……………………..हे शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन करतील. त्यांना मी विनंती करतो.

12. सत्कार मूर्ति विषयी मनोगत व्यक्त करणे.

यानंतर मी या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ति श्री…………यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त करण्यास श्री………….यांना व्यासपीठावर आमंत्रित करीत आहे. (या ठिकाणी तुम्हाला मनोगत व्यक्त करण्यास अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, व इतर व्यक्तींना आमंत्रित करायचं आहे.)

सत्कार समारंभ चारोळया

1. परिश्रमाने कार्य ज्यांचे बहरले आले फळा, सत्काराच्या पुष्पमाला अर्पूया त्यांच्या गळा.

2. व्यक्तित्वाला सात्विकतेची धार आहे, व्यासंगाला तात्विकतेची किनार आहे, आपला सत्कार करणे हा तर आमचाच बहुमान आहे.

3. प्रत्येक यशाचे पाऊल ज्यांच्याकडे वळते, जीवन कसे जगावे ज्यांना पाहून कळते, प्रत्येक सत्कार्याला ज्यांचे पाठबळ मिळते, कर्तव्य म्हणजे काय हे ज्यांना पाहून कळते.

4. तुमच्यामुळे सामान्यांच्या डोळ्यात स्वप्न आकारले, तुमच्यामुळे दीन दुबळ्यांचे सुखी जीवन साकारले.

5. आपल्या या आगमनाने हर्ष मनी तो दाटला, प्रांगणी हा गोतावळा बघा सत्कारास तो जमला. 

टीप:

1. कार्यक्रमापूर्वी Anchoring script तयार करावी.

1. सत्कार होत असताना सुत्रसंचालकाने सर्वांना विनंती करायची आहे कि आदरणीय श्री…….. यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे तरी सर्वांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायच आहे.

2. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर इतर मान्यवरांचा सत्कार करावा.

3. सत्कार मूर्ति यांच्या विषयी भाषण करणार्‍यांची यादी कार्यक्रमाच्या अगोदर बनवावी.

4. सत्कार मूर्ति म्हणजे ज्या मुख्य व्यक्तीचा सत्कार करायचा आहे ती व्यक्ति होय.

5. आवश्यक ठिकाणी चारोळींचा वापर करावा.

Leave a Comment