Fishpond in Marathi for boy, girl, friends, teachers. funny fishponds on friends in Marathi. मराठी फिश्पोंड, फिश पौंड मराठी, shelapagote in Marathi. शेलापागोटे.
समोरून पाहिल्यावर वाटते ऐश्वर्या रॉय आणि पाठीमागून पाहिल्यावर वाटते जरशी गाय.
अटक मटक चवळी चटक तुझी ऊंची वाढत नाही तर कॉलेजच्या गेटला लटक.
तू खूप छान हसते तुला काय वाटते तू एकटीच दात घासते.
पक्षात शहाणा कावळा आणि माणसात अतिशहाणा…..
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे …..च्या नाकावर चष्म्याचे ओझे.
सुंदर कसे असावे ते फुलांकडून शिकावे, मनाने निर्मळ कसे असावे ते शुद्ध पण्याकडून शिकावे, प्रेमळ कसे असावे ते आईकडून शिकावे, आणि मैत्री कशी करावी ते तुमच्याकडून शिकावे.
करायला गेला रक्तदान आणि डॉक्टर म्हणाले बाटली नाही चमचा आण.
बोलतो खणखणीत चालतो खणखणीत जवळ आल्यावर वाटते द्यावी सणसणीत.
स्व:ताला समजते ऐश्वर्या रॉय खर तर तिच्या पेक्षा बरी आमची कामवाली बाई.
लावायली गेली लाईट कमी पडली हाईट.
फिनोलेक्सने आणले पाणी आणि केस पिकले कापासावाणी
खिशात नाही आणा आणि म्हणतो मला बाजीराव म्हणा.
कॉलेजला येतो सुटाबुटात आणि घरी गेल्यावर झोपतो खोंपाटात.
अगोदर वाटतात उत्तरपत्रिका, मग वाटतात प्रश्नपत्रिका आतातरी सांगा कधी देणार लग्नपत्रिका.
दिसायला दिसतात भारी, रहायला राहतात भारी आतातरी लागा संसारी.
आकाशात एक तरी ध्रुव तारा असावा, पाखराला फांदीचा सहारा असावा, आणि आयुष्यात ……सारख्या मैत्रणीचा आधार असावा.
अंगाची काठी तोंडाची वाटी थोबाड बघितल्यावर वाटत गाठली असेल साठी.
आला आला रुकवत त्यात होती बशी बशीत होता गाजराचा हलवा इंग्रजी शिव्या द्यायला …..बोलवा.
आई म्हणते बाळ माझ शहाणं, आणि बाप म्हणतो ही तर आहे कोळशाची खाण.
फेअर लवली लावून झाली गोरी खर तर तुझ्यापेक्षा तुझी मैत्रिणच भारी.
Fishpond in Marathi for boy, girl, friends, teachers.
आकाशातल चांदण जस ….च लाजण ….च हसणं जस तव्यावर काहीतरी घासण.
घाटात घाट खंडाळ्याचा घाट बाई मी बघते लग्नाची वाट.
जेव्हा बघेल तेव्हा मुलींकडे बघत असतो कळत नाही हा अभ्यास कधी करतो
तुला काय वाटत तूच एकटी आहे परी अग तुझ्यापेक्षा आमच्या गल्लितली भाभी बरी.
उजेडात सुद्धा न दिसणारा प्राणी म्हणजे….
एकाला हाय तर दुसऱ्याला बाय आजकालच्या पोरींचा भरोसा काय
तुमच्यासारख्या पोरींना वाटत आम्ही तुमच्या माग माग याव, धाडस करून परपोज करांव, आणि आम्ही काहीच न बोलल्यावर नुसत झुरत रहाव.
मुलींच्या माग फिरण हा त्यांचा धंदा झालाय आणि त्यातच त्यांचा वांदा झालाय.
आजकालची मुले स्वताला समजतात हीरो, आणि पेपर मध्ये मार्क्स मात्र मिळवतात झीरो.
आई बाप म्हणतात पोरग माझ शिकतय पण त्यांना कुठे माहीत पोरग रोज पोरींच्या माग फिरतय.
पोरगा हा तरडफडणारा मासा असतो पोरींचा बाप दिसताच धूम पळणारा ससा असतो.
रोज पोरींच्या माग फिरवतात फट फटी आणि रक्षाबंधन भाऊबीज आल्यावर मारतात कॉलेजला सुट्टी
आय लव यू म्हणायला सगळ्यात पुढे आणि पोरींचा बाप माग लागल्यावर पळत सुटतात घोडे.
पोरांना गॉगल च खुपच वेढ असत मोतीबिंदू झाला कि काय हेच मोठ कोड असत.
मुलीना मुलगा बनायच खूपच वेड असत जीन्स का घालतात हेच मोठ कोड असत.
कॉलेजमधल्या मुलींमध्ये तू आपली नवरी शोधतो तुला काय वाटत तू शाहरुख खान दिसतो.
लेक्चरच्या वेळी सारख्या हसतात त्यांना विचारा हया दात कशाने घासतात.
वर्गात आला नंबर माझा पहिला मी तिचा मजून आणि ती माझी लैला.
कॉलेजच्या पोरी अभ्यास सोडून करतात आमचे हृदय चोरी.
If you like “Fishpond in Marathi for boy, girl, friends, teachers. funny fishponds on friends in Marathi. मराठी फिश्पोंड, फिश पौंड मराठी, shelapagote in Marathi. शेलापागोटे” please share with your friends on social media.