Essay on Dog in Marathi, Dog information in Marathi, majha avadata prani kutra nibandh in Marathi.
कुत्रा हा एक पाळीव प्राणी आहे, प्रत्येकाच्या घरी हमखास सापडणारा एक उपयोगी प्राणी आहे.
शारीरिक रचना:
कुत्र्याला चार पाय, एक तोंड, एक नाक, एक शेपूट, आणि दोन मोठे कान असतात. कुत्र्याचे दात हे धार धार आणि विषारी असतात. कुत्रा हा प्राणी अनेक रंगामध्ये आपणांस पहायला मिळतो.
कुत्र्याचा रंग पांढरा, काळा, करडा, आणि भुरा, इत्यादि प्रकारचा असतो. प्रत्येक घरामधे आवडीने पाळला जाणारा प्राणी कुत्रा हा सर्व प्राण्यांमध्ये प्रामाणिक आहे. आपल्या घराची राखण करणे, घराच्या अंगणामध्ये अनोळखी व्यक्ती आल्यास भुंकणे आणि आपल्या मालकास जागे करणे इत्यादि कामे कुत्रा अगदी प्रामाणिक पणे करतो.
घरी कुत्रा पाळणे हा सध्या सर्व लोकांचा एक छंद बनला आहे. भारतीय देसी जातीच्या कुत्र्यांबरोबर आता दुसर्या देशातील कुत्र्यांच्या जाती घरामध्ये पाळल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामध्ये त्या कुत्र्यांचा आकार, शरीराची रचना, आपल्या भारतीय देसी कुत्र्यांच्या तुलनेत खूप निराळी आहे.
फार पूर्वी पासून कुत्रा पाळणे हा आपल्या भारतीय लोकांचा छंद आहे. ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घरामध्ये कुत्रा पाळला जातो. शेतीची राखण करणे, शेतावरील घराची राखण करणे, शेळीपालन करताना शेळयांची राखण करण्यासाठी मेंढीपालन, पशू पालनामध्ये पाळीव प्राण्यांची राखण करण्यासाठी कुत्रा पाळला जातो.
कुत्र्याचे अन्न:
कुत्रा हा सर्व आहारी प्राणी आहे तो सर्व प्रकारचे अन्न ग्रहण करतो. मांस, दूध, रोटी, मासे, इत्यादि पदार्थ कुत्रा खातो, म्हणजेच सर्व सामान्य माणसाच्या आहारात असणारे सर्व पदार्थ कुत्रा खातो.
कुत्रा हा माणसाळलेला प्राणी आहे तो अतिशय प्रामाणिक आहे. तो चोर, अनोळखी व्यक्ती, यांच्या पासून आपल्या घराचे रक्षण करतो तसेच घरासमोर, घराच्या अंगणातील उपयोगी वस्तूंची देखभाल करणे, घराच्या अंगणातील इतर पाळीव प्राण्यांची इतर भरकटणार्या, वन्यजीव, सरपटणार्या हिंसक प्राण्यांपासून संरक्षण करतो.
Essay on Dog in Marathi
कुत्र्याच्या शारीरिक कसरती:
कुत्रा पोहू शकतो, अतिशय वेगाने धावू शकतो, लहान मुलांबरोबर, खेळत असताना चेंडू पकडणे, त्यांच्या पाठी वेगाने धावणे, दोन पायावरती उभे राहणे, मालक दिसताच मालकाकडे पळून जाऊन मालकासमोर शेपूट हलवणे त्यांच्या अंगावर उडी मारणे, गाडीवर उडी मारून बसणे इत्यादि शारीरिक हालचाली कसरती कुत्रा करत असतो.
सकाळी पहाटे कुत्र्याला सोबत घेऊन फिरायला जाणे, चारचाकी गाडीमध्ये बसवून एखादी चक्कर मारणे त्याला आंघोळ घालणे त्यांच्या आवडीचा सकस आहार त्याला देणे, जसे मांस दूध, इत्यादि अशी अनेक कामे सध्या माणसे आपल्या मोकळ्या वेळात करत असतात.
कुत्रा हा प्राणी सध्या प्रत्येकाच्या जिवाभावाचा मित्र बनला आहे. लहान मुलांना कुत्रा अतिशय आवडतो. लहान मुलांना कुत्र्याबरोबर खेळायला खूप आवडते. काही लोकांना आपला कुत्रा कुठे दिसला नाही तर त्यांना अजिबात करमत नाही त्यांना वाटत कुत्रा नेहमी आपल्या सोबत असावा. कुठे बाहेर फिरायला गेल्यावर ते आपल्या कुत्र्यांना नेहमी सोबत घेऊन जातात.
सध्याच्या जमान्यात माणसापेक्षा कुत्रा हा प्राणी सर्वात प्रमाणिक आहे. एक वेळ माणूस विश्वास घात करेल पण कुत्रा कधीच आपल्याला धोका देऊ शकणार नाही कारण कुत्रा हा न बोलता येणारा मुका प्राणी आहे. खरी माया ही फक्त मुक्या जनावराला असते.
शिकार करताना कुत्रा हा प्राणी अतिशय जलद गतीने धावतो आणि शिकार काही मिनिटातच आपल्या धारदार पंजाने पकडतो. कुत्र्यासारखे प्रेम या जगात कोणीच करू शकत नाही. आपल्या भारत देशामध्ये कुत्र्याच्या अनेक प्रजाती आढळतात. त्याचबरोबर दुसऱ्या देशातील कुत्र्याच्या जाती सुद्धा सध्या भारत देशामध्ये आयात करून घेतल्या जाऊ लागल्या आहेत पांढर्या आणि काळ्या रंगाचे कुत्रे पाळण्यासाठी लोक सध्या जास्त उत्सुक आहेत.
पांढऱ्या रंगाचे कुत्रे दिसायला खूप आकर्षक आहेत. आपल्या भारत देशातील काही भागांमध्ये कुत्र्यांचे लग्नसुद्धा लावले जाते कुत्रा हा प्राणी हुशार आहे. तो आपल्या मालकाचे सर्व हावभाव हातवारे लक्षात घेऊन आपल्या मालकाची आज्ञा पाळतो. संरक्षण खात्यामध्ये मोठ-मोठ्या गुन्ह्याचे तपास लावण्यासाठी कुत्रे पाळली जाऊ लागली आहेत आणि अशा कुत्र्यांना एक विशेष ट्रेनिंग दिले जाऊ लागले आहे.
कुत्रा हा प्राणी वासावरून लगेच कोणत्याही गुन्ह्याचा छडा लावतो कुत्र्याचे कान मोठे असतात. काही कुत्र्याची शेपूट आखूड तर काही कुत्र्याची शेपूट मोठे असतात. अनोळखी व्यक्ती, हिंस्र प्राणी समोर दिसताच कुत्रे अतिशय मोठमोठ्याने भुंकतात. कुत्रा हा जिभेने पाणी पिणारा प्राणी आहे. मांसाहार हे कुत्र्याचे आवडते अन्न आहे. काही कुत्रे मानसिक रोगी असतात ते लोकांचा चावा घेण्यास नेहमी सज्ज असतात आपणास अशा कुत्र्यापासून नेहमी सावध राहिले पाहिजे.
सूचना: जर आपणास “maza avadata prani kutra nibandh in Marathi” “Essay on Dog in Marathi” हा निबंध आवडल्यास आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर शेयर करा.